पुणे : पुण्यातील प्रसिद्ध गृहप्रकल्पात सदनिका खरेदी व्यवहारात ग्राहकाची तब्बल ९ कोटी ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क (मोफा) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निर्माण प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक निलेश प्रभाकर कामठे, दीपमाला गणेश काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी परमजितसिंग अरोरा (वय ५४, रा. कल्याणीनगर, येरवडा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्माण प्रायव्हेट लिमिटेड हि एक बांधकाम करणारी कंपनीआहे. तर आरोपी निलेश प्रभाकर कामठे आणि दीपमाला गणेश काळे हे या कंपनीचे संचालक आहेत. आरोपींच्या गृहप्रकल्पात फोर्यादी अरोरा यांनी सदनिका खरेदी केल्या होता. सदनिका खरेदी व्यवहारात अरोरा यांनी आरोपींना ९ कोटी ११ लाख रुपये दिले होते. त्यानंतर आरोपींनी गृहप्रकल्पाचे काम पूर्ण केले नाही. तसेच अरोरा यांना सदनिकेचा ताबासुद्धा दिला नाही. याबाबत अरोरा यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दिली.
दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने तक्रारीची पडताळणी करुन निलेश कामठे, दीपमाला काळे यांच्या विरोधात महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क (मोफा) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खंडागळे करत आहेत.