Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : पुण्यात चाललंय काय..! लोहगाव परिसरात उशीरापर्यंत सुरु असलेले चायनिज सेंटर बंद केल्याच्या रागातून पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने सपासप वार ; पोलीस गंभीर जखमी..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 15 January 2023, 19:54

पुणे : रात्री उशीरापर्यंत सुरु असलेले चायनिज सेंटर बंद केल्याच्या रागातून एकाने गस्तीवर असलेल्या बीट मार्शल वर चाकूने सपासप वार केल्याची घटना विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. शनिवारी (ता. १४) रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास समायरा चायनिज सेंटर, धानोरी जकात नाका, लोहगाव येथे हि घटना घडली आहे. यामध्ये पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

महानंदेश्वर उर्फ मल्ल्या महादेव बताले (वय- २४ रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) असे मारहाण कलेल्या आरोपीचे नाव आहे. तर पोलीस नाईक सचिन उत्तम जगदाळे असे गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विमानतळ पोलीस ठाण्यात बताले याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस नाईक सचिन जगदाळे हे लोहगाव बीट मार्शलवर गस्त घालीत होते. त्यावेळी त्यांना प्राप्त झालेल्या कॉलनुसार ते समायरा चायनीज सेंटर बंद करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी जेवण करण्यासाठी आला होता. त्याला जेवण मिळाले नसल्याच्या रागातून त्याने चायनिज सेंटर मधील चाकूने जगदाळे यांच्या डाव्या गालावर वार केला. यामध्ये जगदाळे हे गंभीर जखमी झाले. आरोपी बताले याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रात्रगस्त अधिकारी पोलीस उपायुक्त मुख्यालय रोहिदास पवार, विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप, पोलीस निरीक्षक गुन्हे उत्तम चक्रे, सहायक पोलीस निरीक्षक एम.एस. पाठक यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी सचिन जगदाळे यांना तातडीने खासगी दावाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

जुन्नर तालुक्यातील 'वडगाव कांदळी' येथील खुनाचा उलगडा, दोन्ही प्रियकरांना ब्लॅकमेल केल्याच्या करणातून महिलेचा खून ;  आरोपींना बेड्या, ग्रामीण पोलिसांची संयुक्त कामगिरी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.