हिंगोली : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीला धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तिच्याच प्रियकराला हिंगोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील बाळापूरमध्ये हा प्रकार घडला असून तरुणीने तातडीने पोलीस स्टेशन गाठल्याने साजिद पठाण या पीडितेच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
हिंगोलीतील डोंगरकडा येथे दोन महिन्यांपासून शपथ पत्र तयार करून पीडित तरुणी व आरोपी लिव्ह इन मध्ये राहात होते. यात आरोपी साजिद पठाण याने पीडित तरुणीला फूस लावून पळवून नेले.
तसेच विविध ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याच्या शपत पत्रावर करार देखील केला. त्यानंतर दोन महिने हे दोघे लिव्ह इन मध्ये देखील राहिले.
पीडित मुलीने लग्नाची मागणी केल्यावर साजिद पठाणने तिला धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. पीडित मुलीने धर्मातर करायला विरोध केल्यावर मात्र आरोपीने पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर घाबरलेल्या पीडितेने थेट बाळापूर पोलीस स्टेशन गाठले, व आरोपी साजिद पठाण यांच्या विरोधात तक्रार दिली. तक्रारीच्या अनुशंघाने पोलिसांनी देखील कारवाई करताना आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपास बाळापूर पोलीस करत आहेत. .