Pimpri News : पिंपरी : शहर आणि परिसरात लाचखोरीचे गुन्हे वाढत आहेत. पिंपळे सौदागर परिसरात अशीच एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गुन्हा दाखल न करण्यासाठी महिलेकडे ६० हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सांगवी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले.
गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली होती लाच
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सुनील शहाजी जाधव (वय ४९) असे रंगेहाथ पकडलेल्या सहाय्यक फौजदाराचे नाव आहे. (Pimpri News ) ते सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. याबाबत ४५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पिंपळे सौदागर येथे महिलेच्या घराचे बांधकाम चालू असून, याचे कंत्राट बांधकाम व्यावसायिक कराळे यांना दिले होते. ठेकेदार कराळे व तक्रारदार यांच्यात घराच्या बांधकामाबाबत करार झाला होता.
बांधकाम व्यावसायिकांनी हे काम वेळेत पूर्ण केले नाही. तक्रारदार यांच्या ताब्यात असलेले बांधकामाचे साहित्य ठेकेदार हे तक्रारदार यांच्याकडे मागत होते. (Pimpri News ) परंतु, बांधकाम पूर्ण झाल्यावर कराळे यांचे बांधकाम साहित्य देण्यात येईल, असे तक्रारदार यांनी कराळे यांना सांगितले. त्यामुळे कराळे यांनी तक्रारदार यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
या तक्रारीवरून तक्रारदार यांच्याविरुद्ध कारवाई न करण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी सहायक फौजदार जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे पहिल्यांदा ६० हजार रूपये लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर ५० हजार रुपयांची लाचेची मागणी केली.(Pimpri News ) तसेच, ५० हजारांच्या लाचेची रक्कम दोन टप्प्यांमध्ये देण्यास सांगितले.
याप्रकरणी तक्रारदार महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, पथकाने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला. (Pimpri News ) पिंपळे-सौदागर पोलीस चौकी येथे तक्रारदारांकडून पहिल्या टप्प्यातील २५ हजार रूपये लाच स्वीकारताना जाधव यांना रंगेहाथ पकडले. सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीच्या पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : डेबू खान आत्महत्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल