pimpri crime पिंपरी-चिंचवड : विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी मधून समोर आला आहे. पती व सासूच्या त्रासाला कंटाळून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. ही प्रकार बुधवारी (दि. 17) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आला आहे. (Fed up with the troubles of her husband and mother-in-law, the married woman hanged herself in her house)
रहाटणी येथील घटना
याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पती श्रीकांत सावता ढोक (वय 32, रा. रहाटणी) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विवाहितेचा पती व सासूकडून सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. शिवाय नोकरी, लहान मुलांचा सांभाळ करणे आणि घरातील इतर कामावरून विवाहीतेचा छळ केला जात होता. दरम्यान बुधवारी आरोपी पतीने विवाहितेस मारहाण केली. त्यामुळे या सततच्या त्रासातून महिलेने राहत्या घरात गळफास घेतला. पुढील तपास पोलीस करत आहेत.