Pune murder case : पुणे (शिरुर) : पुणे जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. हुंड्याच्या पैशातून वादातून दोन गटात झालेल्या तुंबळ मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे. (Pune murder case) शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथे हा प्रकार घडला आहे.
शिरुर मधील सणसवाडी येथील घटना
देवा रमेश भोसले असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. (One killed due to dispute over dowry) तर मयूर उर्फ बाब्या सुधाकर काळे हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सणसवाडी येथील पप्पू भोसले याच्या बहिणीचे लग्न तीन वर्षापूर्वी तळेगाव ढमढेरे येथील मयूर काळे याच्या सोबत झालेले असताना त्यांच्या समाजातील प्रथेप्रमाणे मयूर याने मुलीच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये देण्याचे ठरले होते. मात्र, तीन वर्षात मयूर याने फक्त 80 हजार रुपये दिलेले होते. त्यामुळे त्यांच्यात वाद होत होता, 15 मे रोजी देखील सायंकाळच्या सुमारास मयूर काळे व आकाश काळे यांचा पप्पू भोसले याच्या सोबत वाद झाला. त्यावेळी त्यांनी ‘आज तुम्हाला सोडणार नाही,’ अशी धमकी देऊन निघून गेले. (One killed due to dispute over dowry)
त्यांनतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मयूर काळे त्याच्या तीन साथीदारांसह भोसले यांच्या घरी आला. त्यावेळी त्यांच्यात लाकडी दांडके, खोरे, दगडांनी तूफान हाणामारी झाली. दरम्यान, मयूर भोसले व त्याच्या साथीदारांनी केलेल्या मारहाणीत देवा भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. (V)तर पप्पू भोसले व त्याच्या दोघा भावांनी केलेल्या मारहाणीत मयूर उर्फ बाब्या सुधाकर काळे (रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे) हा गंभीर जखमी झाला असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Murder | पुण्यात खूनाचं सत्र सुरुच ! कोंढव्यात भर रस्त्यात चाकूने भोसकून तरुणाचा खून…