Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंडमध्ये बेकायदेशीर पिस्तुलसह एकाला अटक ; 53 हजारांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शोध पथकाची कारवाई..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 23 April 2026, 13:04

दौंड, (पुणे) : दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. खडकी (ता. दौंड) येथील शिवाजी महाराज चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली. बुधवारी (ता. 22) दौंड गुन्हे शोध पथकाने हि कारवाई केली आहे.

वैभव संजय शिंदे (रा. खडकी, ता. दौंड) असे अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमाचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतुसे असा 53 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, खडकी येथील शिवाजी महाराज चौक परिसरात वैभव शिंदे हा तरुण संशयास्पद हालचाली करत असून, त्याच्याकडे बेकायदेशीर शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दौंड गुन्हे शोध पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयित आरोपी वैभव शिंदे याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे असा एकूण 53 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.

पोलिसांनी हा सर्व माल जप्त केला असून आरोपीने हे शस्त्र अवैधरित्या खरेदी केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी आरोपी वैभव शिंदे याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. हे शस्त्र त्याने कोणाकडून खरेदी केले आणि त्याचा काय उद्देश होता, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, पोलीस हवालदार नितीन बोराडे, सुभाष राऊत, अमीर शेख, निखिल जाधव, किरण पांढरे, पोलीस कॉन्स्टेबल पवन माने, संजय कोठावळे आणि नितीन दोडमिसे यांच्या पथकाने केली.

 

 

 

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14
Next Post

“थेऊरमध्ये कचऱ्याचा स्फोट; ग्रामपंचायतीला अल्टिमेटम – ‘रविवारपर्यंत साफसफाई करा, नाहीतर कचरा थेट कार्यालयात!’”

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.