Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“थेऊरमध्ये कचऱ्याचा स्फोट; ग्रामपंचायतीला अल्टिमेटम – ‘रविवारपर्यंत साफसफाई करा, नाहीतर कचरा थेट कार्यालयात!’”

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 23 April 2026, 15:58

लोणी काळभोर, ता. 23 : थेऊर (ता. हवेली) गावातील पवित्र धार्मिक स्थळांच्या परिसरात साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला असून ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभाराविरोधात आता उघड बंड पुकारण्याची तयारी स्थानिकांकडून सुरू झाली आहे. “रविवारपर्यंत ग्रामपंचायतीने लक्ष घालून स्वच्छता केली नाही, तर हा सगळा कचरा उचलून थेट ग्रामपंचायत कार्यालयात आणून टाकू,” असा थेट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील  मोरया गोसावी महाराज तपश्चर्या भूमी, सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसर आणि आसपासच्या भागात नागरिकांकडून बेछूटपणे कचरा टाकला जात असून, या पवित्र स्थळांची अक्षरशः कचरा डेपोमध्ये रूपांतर झाले आहे. धार्मिक भावनांशी संबंधित या ठिकाणांची झालेली ही दयनीय अवस्था पाहून स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे, या भागात कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरली असतानाही ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. उलट, संपूर्ण गावात कचरा गाडी फिरत असताना या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचेही समोर आले आहे. परिणामी, काही बेजबाबदार नागरिक येथे कचरा टाकण्याचे प्रकार वाढले आहेत.

 

या परिस्थितीला कंटाळून स्थानिकांनी स्वतः पुढाकार घेत स्वच्छता मोहीम राबवली. पंचायत समिती हवेलीचे सभापती युवराज काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर साफसफाई केली. मात्र, या उपक्रमात ग्रामपंचायतीचा कोणताही सहभाग नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांनी ग्रामपंचायतीसमोर ठोस मागण्या ठेवल्या आहेत. त्यामध्ये संबंधित ठिकाणी ‘कचरा टाकू नका’ असे फलक लावणे, नियमित कचरा गाडी पाठवणे, कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे आणि संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारणे यांचा समावेश आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत अधिकारी टी. एम. पाटील यांच्याकडे लेखी तक्रार देण्यात आली असून, या प्रकरणाची चौकशी करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

गावातील पवित्र स्थळांची होत असलेली ही दुर्दशा पाहता नागरिकांमध्ये संताप वाढत असून, ग्रामपंचायत वेळेत जागी झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. आता तरी प्रशासन जागे होऊन थेऊरला ‘कचरा मुक्त’ करण्यासाठी कठोर पावले उचलणार का, की नागरिकांना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागणार, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26
Next Post
Mumbai Crime: Repeated rape by the man she called uncle; Shocking act revealed after minor girl started having stomach pain..

Kolhapur News : व्याजाच्या पैशांच्या बदल्यात सावकाराने महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले ; मोबाईलमध्ये 200 ते 300 अश्लील व्हिडिओ असल्याचा पिडीतेचा दावा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.