Nashik News : नाशिक : तब्बल १५ दिवस पोलिसांना गुंगारा देणारा ड्रग्स माफिया ललित पाटीलला मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. ललितला अटक झाल्यानंतर त्याच्या आईने पत्रकारांशी संवाद साधून, एकच विनंती केली आहे. ललितला फसवले गेले आहे. पैशांसाठी त्याला टॉर्चर केले जात होते. त्यामुळे त्याने पलायन केले. माझी पोलिसांना एकच विनंती आहे की, त्याचे एन्काऊंटर करू नका. त्याच्या मागे दोन मुले आणि आई-वडील आहेत….
ललितने असं काय केलंय की त्याचा एन्काऊंटर करावा?
ड्रग्स माफिया ललित पाटील याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी १० पथके तयार केली होती. आता त्याला अटक झाल्यामुळे अनेक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ललितला अटक झाल्यानंतर त्याच्या आईने पत्रकारांशी बोलताना सांगितले की, माझी पोलिसांना हात जोडून नम्र विनंती आहे. त्याचे एन्काउंटर करू नका.(Nashik News) त्याच्या मागे दोन मुले आणि आई-वडील असा परिवार आहे. पोलीस योग्य तो निर्णय घेतीलच. मोठमोठे गुन्हे करणारे लोक सहज सुटतात. ललितने असं काय केलंय की त्याचा एन्काऊंटर करावा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
ललितने पलायन केल्यानंतर पोलीस दोनदा आमच्या घरी आले. घराची तपासणी केली. ललित सापडला तर त्याचा एन्काऊंटर करू, असे पोलीस म्हणाले. राजकीय नेतेमंडळी देखील असेच म्हणत आहेत. आम्हाला या गोष्टीची भिती वाटत आहे. (Nashik News) मी पोलिसांच्या पाया पडून एकच विनंती करते की, त्याचे एन्काऊंटर करू नका. ललितला फसवले गेले आहे. त्यामुळे तो या मार्गाला लागला. त्याला पैशासाठी टॉर्चर केले जात होते, त्यामुळे तो घाबरला आहे. आता मुंबई पोलिसांनी त्याला पकडले आहे. त्याने पोलिसांना सहकार्य करावे. आपल्याला फसवल्याचे त्याने पोलिसांना सांगावे.
ललितचे हार्नियाचे ऑपरेशन होणार होते. त्याला तपासणीसाठी नेत असताना डॉक्टर म्हणाले की, आज ऑपरेशन केले आणि उद्या तुरुंगात नेले तर तू जगू शकणार नाही. (Nashik News) त्यामुळे तो घाबरून तिथून पळाला, असा दावाही त्यांनी केला.