Nagar News : अहमदनगर : जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला कोतवाली पोलिसांनी केडगाव परिसरातून मंगळवारी (ता.२२) अटक केली आहे.
सोहेल फिरोज शेख (वय-२६, रा.केडगाव, जि.अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राहुल प्रल्हाद शेळके (वय २४ वर्षे रा. केडगाव, अहमदनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेळके यांनी आरोपी चांद पठाण व सोहेल शेख यांनी केडगाव परिसरात गाठून धारदार शस्त्राने कानावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना १२ जुन २०२३ रोजी घडली होती. याप्रकरणी शेळके यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
दरम्यान, गुन्हा दाखल होताच, आरोपी चांद पठाण व सोहेल शेख हे फरार झाले होते. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आरोपींना पकडण्यासाठी एक पथक तयार केले होते. (Nagar News)
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांना खुनी हल्ल्याच्या गुन्ह्यातील आरोपी सोहेल फिरोज शेख हा केडगाव परिसरात येणार आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी केडगाव परिसरात सापळा रचून आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. (Nagar News)
हि कामगिरी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे,
पोलीस अंमलदार शाहिद शेख, रविंद्र टकले, मोहन भेटे, नकुल टिपरे, प्रमोद लहारे, सुमित गवळी, दिपक रोहकले यांच्या पथकाने केली आहे. (Nagar News)