Nagar Sad News | श्रीगोंदा, (नगर) : श्रीगोंदा तालुक्यातील एका शिक्षकाला हनुमान जयंतीच्या मिरवणुकीतील डीजेच्या आवाजामुळे आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे.
अशोक बाबूराव खंडागळे (वय ५८ ) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.
हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत डीजेच्या आवाजाने त्यांना त्रास सुरु झाला होता. यावेळी ते कोमात गेले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. महिनाभर मृत्यूची झुंज दिल्यानंतर शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
अशोक खंडागळे हे हनुमान जयंतीच्या दिवशी कौडाणे येथे गेले होते. तेथे डीजेच्या आवाजाने त्यांना त्रास होऊ लागला. त्यातच ते कोमात गेले. महिनाभर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची झुंज अपयशी ठरली. शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर पार्थिवावर कौडाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
३१ मे रोजी होणार होते सेवानिवृत्त…
खंडागळे यांच्या मृत्यूला थेट डीजेचा कारणीभूत आहे का, हे नेमकेपणाने स्पष्ट झालं नाही. मात्र डीजेचा आवाज ऐकल्यापासूनच त्यांना त्रास सुरू झाला होता. त्यामुळे ते कोमात गेले होते. खंडागळे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंब, नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ३१ मे रोजी ते सेवानिवृत्त होणार होते. त्यानिमित्त शिक्षकांनी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित केला होता.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Daund Crime : एसटी बसमधील महिला प्रवाशाच्या बॅगमधून ४ लाख २५ हजार रूपयांचे दागिने लंपास
Pune Crime : बँक मॅनेजरनेच एका आयटी कर्मचार्याला घातला तब्बल २७ लाख रुपयांना गंडा