Nagar News : कोतवाली, (नगर) : कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी घेउन आलेल्या तीन आरोपींना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल, दुचाकीसह १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Nagar News)
लूकमान अरमान मदारी (वय २७, रा. बोरकेनगर, जुन्नर जि. पुणे), अरबाज मदारी (वय २१, रा. बोरके नगर, जुन्नर जि. पुणे), गणेश बाबासाहेब बोडके (वय १९ रा. सारसनगर, अहमदनगर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तीन आरोपींचे नाव आहे. (Nagar News)
कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारीला आळा बसावा, यासाठी कोतवाली पोलिसांनी आता रात्री दरम्यान पायी पेट्रोलिंग करायला सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांत रात्री अपरात्री फिरून चोऱ्या, दादागिरी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. शनिवारी (ता. ०३) कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत असताना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. (Nagar News)
या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक यादव यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार माळीवाडा वेशीजवळ मोबाईल विक्री करण्याकरिता आलेल्या लूकमान मदारी याला ताब्यात घेवून त्याच्याकडून एक ॲप्पल आणि एक सॅमसंग असे ४० हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
दरम्यान, काटवन खंडोबा येथे चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी आलेल्या अरबाज मदारी याला ताब्यात घेवून २० हजार रुपये किमतीची होंडा ड्रिम सिटी मोटारसायकल जप्त करण्यात आली. तिसरी कारवाई सक्कर चौक येथे (Nagar News) करण्यात आली असून चोरीतील मोबाईल विक्री करण्यासाठी आलेल्या गणेश बोडकेयाला ताब्यात घेवून ४० हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. (Nagar News)
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलीस हवालदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगार दिवे, पोना अब्दुल कादर इनामदार, योगेश खामकर, पोलीस नाईक सलीम शेख, अभय कदम, संदीप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, अतुल काजळे यांच्या पथकाने केली आहे. (Nagar News)