Mumbai News : मुंबई : जयपूर ते मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. जयपूर-मुंबई एक्स्प्रेसच्या बी-५ बोगीमध्ये ही गोळीबाराची घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर-मुंबई ही सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलकडे जात होती. तेव्हा गाडीत सुरक्षेच्या कारणास्तव कार्यरत असलेला आरपीएफ जवान चेतन याने एएसआय टिकाराम यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात टिकाराम यांच्यासह अन्य तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आरपीएफ जवान चालत्या रेल्वे गाडीतून उडी मारून फरार झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरपीएफ अधिकारी आणि तीन प्रवाशांचा मृत्यू
जयपूर एक्स्प्रेसमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आरपीएफ कॉन्स्टेबलनेच गोळीबार केला असून, त्याला ताब्यात घेतले आहे.(Mumbai News ) मृतांमध्ये आरपीएफच्या अधिकारी आणि तीन प्रवाशांचा समावेश आहे. चेतन सिंह असे आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबलचे नाव आहे.
ही ट्रेन राजस्थानमधून महाराष्ट्रातील पालघरमध्ये दाखल होताच या ट्रेनमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात चार जण जागीच गतप्राण झाले. तर काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. (Mumbai News ) घटनेची माहिती मिळतात जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन अधिक तपास करत आहेत. गोळीबारानंतर पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. सध्या ही मुंबई सेंट्रल येथे दाखल झाली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : अजिंक्य रहाणेचा चाहत्यांना मोठा झटका ; ‘या’ संघाकडून खेळण्यास नकार!
Mumbai News : पुन्हा एकदा छाबड हाऊस दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? कुलाब्यात यंत्रणा अलर्ट मोडवर…