Mumbai News : मुंबई : जयपूर-मुंबई पॅसेंजर गोळीबार प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन हा मानसिकदृष्ट्या खचलेला होता, अशी माहिती मिळत आहे. या अस्वस्थ मानसिकतेतूनच त्याने हा गोळीबार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, रेल्वे दलात काम करणारा आरोपी चेतन सिंह याची गुजरातहून मुंबईला बदली झाली होती. त्याच्या मनाविरूद्ध ही बदली झाल्याने तो नाराज होता. (Mumbai News ) यामुळे तो अस्वस्थ होता. या अस्वस्थतेतूनच त्याने हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु
बोरीवली पोलिसांकडून आरोपीची अद्याप चौकशी सुरु आहे. चौकशीत आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. आरोपीवर सध्या हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दुपारी ३ वाजता आरोपीला बोरीवली कोर्टात हजर केले जाणार आहे.
आरोपीने गोळीबार करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जीआरपीच्या दोन जवानांनी त्याला पकडले. बी-५ बोगीच्या शेजारी असलेल्या पँट्रीच्या दरवाजावरही गोळी लागली आहे. दरम्यान, गोळीबारानंतर प्रवाशांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या हेतूने आरोपी ट्रेनमध्ये फिरत होता. (Mumbai News ) मुंबई सेंट्रल स्थानकात फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. ट्रेन कारशेडला रवाना करण्यात आली आहे. तेथे ट्रेनची तपासणी फॉरेन्सिक टीम करणार आहे.
सूरतमध्ये आरोपी चेतन आणि एएसआय टीकाराम यांची ड्युटी सुरु झाली. यानंतर पालघर ते विवार दरम्यान ट्रेन आली असताना चेतन आणि टीकाराम यांच्यात वाद झाला. याच वादातून चेतन याने टीकाराम यांच्यावर गोळीबार केला. (Mumbai News ) गोळीबारानंतर एएसआय टीकाराम यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर प्रवाशांनी आरोपीला जाब विचारण्यास सुरुवात केली. यामुळे आरोपीने तीन प्रवाशांवरही गोळीबार केला.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु
Mumbai News : जयपूर-मुंबई पॅसेंजर एक्स्प्रेस गोळीबार; आरोपी चेतन सिंह जीआरपीच्या ताब्यात
Mumbai News : अजिंक्य रहाणेचा चाहत्यांना मोठा झटका ; ‘या’ संघाकडून खेळण्यास नकार!
Mumbai News : पुन्हा एकदा छाबड हाऊस दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? कुलाब्यात यंत्रणा अलर्ट मोडवर…