Lonikand News : (पुणे) लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली येथील एक सराईत गुन्हेगार पुणे जिल्ह्यातून १ वर्षांसाठी तडीपार करण्यात आला आहे. अशी माहिती लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांनी दिली.(Lonikand News)
पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे तडीपार.
सागर कुमार गायकवाड, (वय-३३, रा. अमर चौक केसनंद ता. हवेली) असे तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आसपासच्या भागात दहशत निर्माण करुन लोकांना तसेच सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देऊन दहशत निर्माण करायचे. लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणान्या सराईत गुन्हेगाराच्या कृत्यामुळे लोकांच्या मनातून कायद्याविषयी संभ्रम निर्माण होवु नये, तसेच सदर सराईत गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने हि कारवाई करण्यात आली आहे.(Lonikand News)
गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन सदर इसम यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे तडीपार करणेबाबत पोलीस उपायुक्त श्री. शशिकांत बोराटे यांना प्रस्ताव पाठविला असता, शशिकांत बोराटे यांनी सदर सराईतास पुणे जिल्ह्याचे हद्दीतुन एक वर्षाकरीता तडीपार केले आहे.(Lonikand News)
सदरची कामगिरी सहायक पोलीस आयुक्त शशिकांत बोराटे, संजय पाटील, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु यांनी केली आहे.(Lonikand News)
दरम्यान, सदरचे तडीपार इसम हे पुणे जिल्ह्याचे परिसरात आढळुन आल्यास त्यांची माहीती लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर संपर्क क्र. ९५२७०६९१०० यावर कळविण्याचे आवाहन लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांनी केले आहे.