लोणी काळभोर (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील प्रतिक मंगल कार्यालयाच्या पाठीमागे विनापरवाना आणि बेकायदेशिररित्या जुगार खेळणाऱ्या पाच जणांना लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हि घटना मंगळवारी (ता. ०१) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
अशोक धोंडीबा जेधे (वय-५६ रा. जेधेवाडी खानापूर ता. भोर) निखील संजय मोरे (वय-२१ रा.जिल्हा परिषद शाळेसमोर मातोश्री बि. दुसरा मजला कदमवाकवस्ती ता. हवेली), सुनिल कुंडलिक खलसे (वय-३५ रा. पांढरस्थळ जुन्या कॅनॉलचे पुढे उरुळी कांचन ता. हवेली), किरण नामदेव कासार (वय-२९ रा. सातववाडी, हडपसर) अन्वर जाफर सिकंदर (वय-२९ रा. हनुमान मंदिराशेजारी कवडीपाट कदमवाकवस्ती, ता. हवेली) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा २ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी दिपक सुनील सोनावणे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलिसांना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील प्रतिक मंगल कार्यालयाच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना आणि बेकायदेशिररित्या काही नागरिक जुगार खेळत असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत पोलिसांनी मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे लोणी काळभोर पोलिसांनी मंगळवारी (ता. ०१) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी वरील पाच इसम मिळून आले.
दरम्यान, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी वरीलप्रमाणे त्यांची नावे सांगितली. त्यांच्याकडून पोलिसांनी जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा २ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे करीत आहेत.