Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : किरकोळ कारणावरून सेवा निवृत्त सैनिकाने पुतण्यावर तीन राउंड फायर (गोळीबार) केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. रविवारी (ता. १३) रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास जुन्या अंबरनाथ मंदिराजवळ घडली आहे. याप्रकरणी आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.
गोळीबार केल्याची धक्कादायक घटना
प्रदीप तुकाराम जाधव (वय-४४, रा. जुन्या अंबरनाथ मंदिराजवळ, लोणी काळभोर, ता. हवेली) असे गोळीबार केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विकास दीपक जाधव (वय-२६, रा. जुन्या, अंबरनाथ मंदिराजवळ, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास जाधव हे परिवाराश लोणी काळभोर परिसरात राहत असून बिगारी काम करतात. तसेच त्यांचे चुलत चुलते प्रदिप जाधव हे आर्मी मधुन रिटायर असून त्यांचचेकडे परवानाची बारा बोअर रायफल आहे. ते त्यांच्या परिवारासह घराचे मागील बाजुस राहण्यास आहेत.
रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास विकास जाधव हे मोटार सायकलवरून खोकलाई देवी चौक या ठिकाणी जात असताना गाडीसमोरुण चुलते प्रदीप जाधव हे निघाले होते. यावेळी त्यांना होर्न वाजविला व बाजूला होण्यास सांगितले. परंतु ते बाजुला झाले नाहीत. दुपारी कंपनीत कामाला जात असताना विकास याने प्रदीप जाधव यांना जाब विचारला कि मी तुम्हाला काही बोललो नाही तरी तुम्ही घरी काय सांगितले. यावेळी चुलते यांनी सांगीतले कि, मी कामावर चाललो आहे. मी कामावरुन आल्यावर तुला दाखवतो.
रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास चुलत चुलती सुषमा जाघव व चुलते संदिप जाधव यांना विनाकारण शिवीगाळ करत आहेत. असा फोन रोहन जाधव यांनी विकास जाधव यांना केला. यावेळी विकास हा प्रदिप जाधव यांचे घरी गेले असता दोघांची बाचाबाची झाली. यावेळी प्रदीप जाधव यांनी त्यांचेकडे परवाना असणा-या बारा बोअर बंदुकीतुन विकास जाधव यांच्यावर ३ गोळ्या झाडल्या. यावेळी विकास यांनी भिंतीच्या आडोशाला आसरा घेतल्याने त्यांचा जीव वाचला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, आरोपी प्रदीप जाधव याला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे करीत आहेत.