Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांना मिळणार ‘स्वातंत्र्य’

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 14 August 2023, 11:22

Pune News  : पुणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त यंदा १५ ऑगस्ट रोजी राज्यातील विविध तुरुंगातील निम्म्याहून अधिक शिक्षा भोगलेल्या तब्बल १८६ कैद्यांची मुक्तता करण्यात येणार आहे. कैद्यांसाठी हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यदिन ठरणार आहे. या निर्णयामुळे किरकोळ गुन्ह्यांखाली विविध तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षभरात तीन टप्प्यांत शिक्षेत देण्यात आलेल्या विशेष माफीमुळे ५८१ कैद्यांना कारागृहातून सोडण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यानुसार मंगळवारी (१५ ऑगस्ट) विशेष माफी देण्यात आलेल्या कैद्यांची कारागृहातून मुक्तता करण्यात येणार आहे, अशी माहिती कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली.

चांगली वर्तणूक ठेवणाऱ्या कैद्यांची सुटका

अमृतमहोत्सवी वर्षाच्या पहिल्या टप्प्यात १५ ऑगस्ट २०२२ रोजी २०६, दुसऱ्या टप्प्यात म्हणजे यावर्षी २६ जानेवारी २०२३ रोजी १८९ कैद्यांना विशेष माफी देऊन तुरुंगातून मुक्त करण्यात आले होते. आता तिसऱ्या टप्प्यात १५ ऑगस्ट २०२३ रोजी एकूण १८६ कैद्यांना सोडण्यात येणार आहे. कारागृहातील विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना तीन टप्यांमध्ये विशेष माफी देण्यात आली आहे. (Pune News ) कैद्यांमधील शिस्त, त्यांचे आचारण विचारात घेऊन त्यांना भावी आयुष्यात प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षा माफ करण्यात आली आहे, असे कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून माफी योजनेचे निकष निश्चित केले होते. राज्यातील कैद्यांची शिक्षा माफ करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या शिफारशीनुसार कैद्यांची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या प्रस्तावास राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्यात १५ ऑगस्ट २०२२ रोजी २०६ कैद्यांची शिक्षा माफ करण्यात आली होती. (Pune News ) दुसऱ्या टप्यात २६ जानेवारी २०२३ रोजी १८९ कैद्यांची शिक्षा माफ करण्यात आली होती. तिसऱ्या टप्यात १५ ऑगस्ट २०२३ रोजी १८६ कैद्यांची शिक्षा माफ करण्यात आली आहे. राज्यातील येरवडा, मुंबई, नाशिक रोड, ठाणे, नागपूर, अमरावतीसह २४ कारागृहांतील कैद्यांची शिक्षा माफ करण्यात आली आहे.

 

तुरुंगातील शिस्त आणि चांगली वर्तणूक ठेवणाऱ्या कैद्यांची सुटका करून त्यांनी गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक बनण्यासाठी प्रोत्साहन म्हणून त्यांना ही संधी दिली जाते. यासाठीच शिक्षेचा ५० टक्के कालावधी पूर्ण केलेले राज्यात ७ कैदी आहेत. काही कैद्यांनी तारुण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांनी कोणताही गुन्हा केला नाही. अशा राज्यातील दहा कैद्यांची मुक्तता करण्यात येणार आहे. तरुण कैद्यांनी शिक्षेचा ५० टक्के कालावधी पूर्ण करणे गरजेचे आहे. (Pune News ) काही बंद्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. अशा कैद्यांनी शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्यास त्यांची मुक्तता करण्यात येणार आहे. शिक्षेत सुनावण्यात आलेल्या दंडाची रक्कम भरण्यास असमर्थ असणाऱ्या कैद्यांची मुक्तता करण्यात येणार आहे. एकूण शिक्षेचा ६६ टक्के कालावधी पूर्ण करणाऱ्या १६७ कैद्यांना विशेष माफी देण्यात आली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : कात्रज-कोंढवा रस्त्यावर अवजड ट्रकच्या चाकाखाली सापडून ज्येष्ठ महिलेचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Pune News : ट्रेलरच्या धडकेत टेम्पो चालक जागीच ठार

Pune News : कोथरूडमध्ये दहशत माजवली; ओंकार कुडलेविरुद्ध मोक्का कारवाई

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38
Next Post

Pune News : तुझ्यासह दुकान फोडीन... धमकी देत तीन गुंडांचा शेवाळवाडीत हैदोस; गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.