हनुमंत चिकणे
Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : दादर जंक्शन रेल्वे स्टेशनवरती बॉम्ब आहे अशी खोटी माहीती देऊन लोकांचे मनामध्ये भिती व घबराट, अशांतता निर्माण करून अफवा पसरविणाऱ्या तरुणाला लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील “जयश्री हॉटेल” परिसरातून रविवारी (ता. १६) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या हि घटना घडली आहे. Loni Kalbhor News
योगेश शिवाजी ढेरे (रा. घर नं ११९३ गोखलेनगर, विठ्ठल रुक्मीनी – मंदीर जवळ जनवाडी, पुणे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार प्रशांत प्रकाश सुतार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Loni Kalbhor News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी प्रशांत सुतार व त्यांचे सहकारी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रशांत सुतार व योगेश पाटील हे गस्त घालीत असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर येथील “जयश्री हॉटेल” या ठिकाणी कॉलर थांबले आहेत. कॉलर सांगत आहे की, दादर जंक्शन रेल्वे स्टेशन वरती बॉम्ब आहे. तसेच कॉलर हा लोणी काळभोर हद्दीतील कवडीपाट टोलनाका परिसरात आहे. यावेळी मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी असलेल्या कॉलर यांचेशी मोबाईलवर संपर्क साधला असता फोन नंबर बंद मिळुन आला.
सदर ठिकाणी असलेल्या हॉटेल जयश्री येथील कामगारांकडे मोबाईल क्रमांक बाबत चौकशी केली असता सदर मोबाईल योगेश ढेरे याचा असल्याचे समजले. यावेळी योगेश ढेरे याचा शोध घेतला असता तो हॉटेलचे बाहेर मिळुन आला. त्याच्याकडे सदर कॉलचे अनुशंघाने चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे मोबाईल मिळून आला.
दरम्यान, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता लोकांमध्ये घबराट निर्माण होवून पळापळ होवुन चेंगराचेंगरीमध्ये जीवीतहानी व्हावी या उद्देशाने पोलीसांना खोटी माहीती दिल्याचे निष्पन्न झाले आहे. Loni Kalbhor News