Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोरमधील एका नामांकित शैक्षणिक संस्थेतील २६ वर्षीय विद्यार्थ्याने ३६ वर्षीय प्राध्यापिकेचा आक्षेपार्ह व्हिडिओ, तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे पाच हजार डॉलरची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका तरुणावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Loni Kalbhor News)
मयंक सिंग (वय २६, रा. पाटणा, बिहार) असे गुन्हा दाखल केलेल्या महाविद्यालयीन युवकाचे नाव आहे. याबाबत एका प्राध्यापक महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Loni Kalbhor News)
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्राध्यापक महिला या लोणी काळभोर येथील एका नामांकित शैक्षणिक संस्थेत प्राध्यापक आहेत. मयंक सिंगने प्राध्यापिकेला समाजमाध्यमातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. त्यानंतर त्याने समाजमाध्यमातील संपर्क यंत्रणेचा वापर करुन प्राध्यापिकेला धमकावण्यास सुरुवात केली. (Loni Kalbhor News)
मी सांगितले तसे नाही केले तर समाजमाध्यमात तुमचे फोटो व्हायरल करुन बदनामी करेल, अशी धमकी त्याने दिली होती. त्यानंतर त्याने प्राध्यापिकेला धमकावून त्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला. त्यानंतर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तो व्हिडिओ त्यांच्या पतीस पाठविला, तसेच त्यांच्याकडे पाच हजार अमेरिकन डॉलरची मागणी केली. (Loni Kalbhor News)
दरम्यान, आरोपीने दिलेल्या धमकीमुळे घाबरलेल्या प्राध्यापक महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक गंधाले तपास करत आहेत. (Loni Kalbhor News)