Loni Kalbhor News : लोणी काळभोर, ता.२९ : पुण्यात तब्बल ६० लाखांचे ३ किलो अफीम विक्री करण्यासाठी आलेल्या परराज्यातील एका तस्कराला अंमली पदार्थ विरोधी पथक क्र.२ च्या पथकाने फुरसुंगी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गोडाऊन येथील बदरके गोडाऊन जवळून शुक्रवारी (ता.२८) अटक केली आहे.(Loni Kalbhor News) मोहनलाल मेगाराम बिश्नोई (वय-२४ रा. बगरापूर मारवाडी, तहसील बुडामालाने, जि. बाडनेर राज्य राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.(Loni Kalbhor News)
६० लाखांचे ३ किलो अफीम जप्त.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक क्र.२ हे हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करीत होते. गस्त घालत असताना, पथकातील पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना गंगानगर येथील बदरके यांच्या गोडाऊनजवळील सार्वजनिक रोडवर एकजण अफिम हा अंमली पदार्थ विक्री करण्यासा येणार आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.(Loni Kalbhor News)
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपी बिश्नोई याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे ६० लाख रुपये किंमतीचे ३ किलो २९ ग्रॅम अफिम आणि १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त केला. आरोपीवर हडपसर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Loni Kalbhor News)
ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक क्र.२ चे पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. डी. नरके, दिगंबर चव्हाण, पोलीस अमलदार योगेश मांढरे, शिवाजी घुले, प्रशांत बोमादंडी, संतोष देशपांडे, संदीप जाधव, महेश साळुंखे, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, संदीप शेळके, रवी रोकडे यांच्या पथकाने केली आहे.