Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील लेडी डीओची “पोलीस ठाण्यातच ‘दहशत’?” विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीसारखे खोटे गुन्हे दाखल करण्याची सहकाऱ्यांनाच धमकी दिल्याचा आरोप..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 22 April 2026, 14:08

उरुळी कांचन, (पुणे) : सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाणारे पोलीस ठाणेच आता भीतीचे केंद्र बनत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस ठाण्यातील एका महिला ‘ड्युटी ऑफिसर’वर (लेडी डीओ) स्वतःच्या सहकाऱ्यांनाच खोट्या गुन्ह्यांची धमकी देत मानसिक छळ केल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांनी थेट जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केल्याने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

ड्युटी वाटपाच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत आहे. “जे कर्मचारी दरमहा ठराविक रक्कम देतात, त्यांनाच सोयीस्कर ड्युटी दिली जाते, तर पैसे देण्यास नकार देणाऱ्यांना जाणीवपूर्वक रात्रपाळी, वायरलेस व सीसीटीएनएससारखी दुहेरी जबाबदारी देऊन त्रास दिला जातो,” असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर हजेरीतही पक्षपात होत असल्याचे समोर आले आहे. या सततच्या छळामुळे अनेक महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदलीसाठी अर्ज केल्याची माहितीही पुढे आली आहे. “वरिष्ठांकडे तक्रार केली तरी आधीच आमच्याविरोधात चुकीची माहिती पोहोचवली जाते,” अशी खंत काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

सदर महिला पोलीस शिपाई जून 2025 मध्ये यवत (ता. दौंड) येथून बदली होऊन उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस ठाण्यात रुजू झाल्या. रुजू झाल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच राजकीय प्रभाव वापरून त्यांनी हजेरी अंमलदारसारखे महत्त्वाचे पद मिळवल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून त्या या पदाचा गैरवापर करून कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

वादग्रस्त भूतकाळ उघडकीस
या महिला कर्मचाऱ्यांचा पूर्वइतिहासही वादग्रस्त असल्याचे समोर आले आहे. सासवड पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई झाली होती. तसेच यवत पोलीस ठाण्यात असताना देखील तक्रारी वाढल्याने तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी त्यांना अकार्यकारी पदावर ठेवण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही उरुळी कांचन येथे महत्त्वाचे पद कसे मिळाले, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

अवैध व्यवसायांना पाठबळ?
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे संबंधित महिला कर्मचारी स्थानिक असून उरुळी कांचन परिसरात दोन हॉटेल्सला पाठबळ देत असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू असल्याचा आरोप होत असून, स्वतः पोलीस दलात असूनही बेकायदेशीर व्यवसायांना पाठबळ दिले जात असल्याने पोलीस प्रशासनाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक लवकरच वार्षिक तपासणीसाठी येणार असल्याने या प्रकरणातील सर्व पुरावे सादर करून संपूर्ण प्रकार उघड करण्याची तयारी तक्रारदार कर्मचाऱ्यांनी सुरू केली आहे. परंतु सध्या उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील हा अंतर्गत वाद उग्र रूप धारण करत असून, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल या गंभीर आरोपांवर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नागरिकांमध्येही या घटनेमुळे अस्वस्थता निर्माण झाली असून, पोलीस यंत्रणेवरील विश्वासाला धक्का बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39
Next Post

Fursungi : ‘कामे करा, नाहीतर आंदोलन!’ – फुरसुंगी-उरुळी देवाचीत 4 मे रोजी भाजपचा इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.