संदीप टूले
Kedgoan News : केडगाव, (पुणे) : उसने घेतलेले पैसे देण्याच्या वादातून केडगाव (ता. दौंड) येथे दोन युवकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील एकूण ६ आरोपींना यवत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये दोन अल्पवयीनचा समावेश आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.(Kedgoan News)
६ आरोपींना यवत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सलमान जैनुउद्दीन राजे (वय – २१ रा. केडगाव, ता. दौंड), ज्ञानेश्वर दिलीप डोंगरे (वय- २२ रा. इंदिरानगर, केडगाव), तेजस उर्फ कार्तिक मारुती गायकवाड (रा. पत्राकंपनी चाळ ,केडगाव), ओंकार कैलास मोहिते (वय – २१ रा. आंबेगाव, केडगाव) व दोन विधी संघर्ष ग्रस्त बालक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.(Kedgoan News)
यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. ११) संध्याकाळी हर्षल गायकवाड आणि राहुल गायकवाड या दोन तरुणांचे सलमान राजे याच्या बरोबर पैशांच्या देवाण घेवाणीतून वाद झाला होता. यावेळी सलमान राजे याने हर्शल व राहुल या दोघांना तो राहत असलेल्या एका ठिकाणी येण्यासाठी सांगितले होते.(Kedgoan News)
दरम्यान, दोघेजण सलमान राहत असलेल्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी पाच ते सहा जणांनी या दोघांवर तलवार, कोयता सारख्या धारदार शस्त्रांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, हा हल्ला केवळ उसने घेतलेले पैसे देण्याच्या वादातून झाला असल्याची माहिती फिर्यादीने यवत पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.