Sex Determination Racket : उरुळी कांचन, (पुणे) : दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात उघडकीस आलेल्या अत्यंत हाय-प्रोफाइल आणि बेकायदेशीर गर्भलिंगनिदान प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यात यवत पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी या रॅकेटची व्याप्ती वाढवली असून, आता थेट उरुळी कांचन (ता. हवेली) आणि किकवी (ता. भोर) येथील दोन नामांकित डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे या काळ्या धंद्यातील एकूण आरोपींची संख्या आता पाच झाली असून, ग्रामीण भागातील डॉक्टरांचे मोठे रॅकेट उघड होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. Sex Determination Racket :

सुंदरम कदम (पूर्ण नाव माहिती नाही, उरुळी कांचन, ता. हवेली) व डॉ. मंदार माळी (किकवी, ता. भोर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही सध्या फरार असून यवत पोलीस त्यांच्या मागावर आहेत. तर अण्णासाहेब गिरी आणि त्याचा डॉक्टर साथीदार अतुल जाधव याला पुन्हा दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. Sex Determination Racket :

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्भलिंगनिदान करण्यासाठी या रॅकेटचा मुख्य म्होरक्या अण्णासाहेब गिरी हा जे बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन वापरत होता, ते मशीन त्याला नरेंद्र ठाकरे नावाच्या आरोपीने पुरवले होते. हा आरोपी नरेंद्र ठाकरे सध्या जेलची हवा खात आहे. Sex Determination Racket :
दरम्यान, अटक करण्यात आलेला मुख्य संशयित अण्णासाहेब गिरी आणि त्याचा डॉक्टर साथीदार अतुल जाधव या दोघांनाही न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत त्यांच्याकडून सुरू असलेल्या चौकशीतूनच या फरार दोन्ही डॉक्टरांची नावे निष्पन्न झाली आहेत. पोलीस उपनिरीक्षक (PSI) मारोती मेतलवाड हे या गुन्ह्याचा सखोल तपास करत आहेत. Sex Determination Racket :







