Thursday, May 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेट ; उरुळी कांचनचे ‘ते’ डॉक्टर पोलिसांच्या रडारवर, दलालांची मोठी साखळी असण्याचा संशय..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 28 May 2026, 11:11

उरुळी कांचन, (पुणे) : दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात उघडकीस आलेल्या हाय-प्रोफाइल बेकायदेशीर गर्भलिंगनिदान प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यवत पोलिसांनी या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढत तपासाची व्याप्ती वाढवली असून, वाघोली (ता. हवेली) येथून डॉ. अतुल जाधव या बड्या डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत.

न्यायालयाने आरोपी डॉक्टरला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या काळ्या धंद्यात आता उरुळी कांचन (ता. हवेली) येथीलही एका नामांकित डॉक्टरांचा समावेश असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली असून, पोलिसांचे पथक त्यांच्यावरही नजर ठेवून आहे.

 

पोलीस तपासात या प्रकरणातील मुख्य आरोपी अण्णा गिरी याला पोलिसांनी यापूर्वीच बेड्या ठोकल्या असून, त्याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अण्णा गिरी याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली असून केवळ काही वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर तो हा गर्भलिंगनिदानाचा जीवघेणा काळाबाजार चालवत होता.

पोलिसांनी अण्णा गिरीची कसून चौकशी केली असता ‘वाघोली कनेक्शन’ समोर आले. अण्णा गिरी हा गर्भवती महिलांचे बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान करायचा. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी (गर्भपातासाठी किंवा उपचारासाठी) तो या महिलांना वाघोली येथील डॉ. अतुल जाधव यांच्याकडे पाठवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अटक करण्यात आलेले डॉ. अतुल जाधव हे ‘बीएएमएस’ पदवीधारक असून, एका पदवीधराने बोगस डॉक्टरसोबत हातमिळवणी करून हा गोरखधंदा चालवल्याने वैद्यकीय क्षेत्रातून संताप व्यक्त होत आहे.

वाघोलीच्या डॉक्टरला अटक झाल्यानंतर आता या प्रकरणाची सुई उरुळी कांचनकडे वळली आहे. अण्णा गिरी हा उरुळी कांचन परिसरातील एका डॉक्टराच्याही संपर्कात होता आणि त्यांच्याकडेही काही महिलांना पाठवले गेल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उरुळी कांचनचे ‘ते’ संशयित डॉक्टर कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या संपूर्ण रॅकेटच्या मागे केवळ दोन डॉक्टर नसून, गर्भलिंगनिदान करणारी खूप मोठी आंतरजिल्हा साखळी, काही दलाल आणि औषध विक्रेते कार्यरत असल्याचा संशय यवत पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात अजून कोणते बडे मासे गजाआड होणार? आणि उरुळी कांचनच्या संशयित डॉक्टरांवर पोलीस कधी कारवाई करणार? याकडे आता जागरूक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात धूळ खात पडलेल्या वाहनांना अखेर ‘घरचा रस्ता’ ; धूळ खात पडलेली 13 वाहने मूळ मालकांच्या स्वाधीन, 5 लाखांचा मुद्देमाल परत, आणखी 50 वाहनांचा शोध सुरू..

Thursday, 28 May 2026, 11:52

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेट ; उरुळी कांचनचे ‘ते’ डॉक्टर पोलिसांच्या रडारवर, दलालांची मोठी साखळी असण्याचा संशय..

Thursday, 28 May 2026, 11:11

Kidnapping Case : नायगाव फाट्यावरून 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण ; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल..

Thursday, 28 May 2026, 10:27

Andekar Gang : अहिल्यानगर येथे आंदेकर टोळीतील 5 जण अटकेत, गावठी कट्टे-काडतुसे जप्त..

Thursday, 28 May 2026, 10:24

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन! साखर आणि फळ उत्पादकांसाठीही दिल्लीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Wednesday, 27 May 2026, 20:52

जामिनावर सुटका होताच अग्रवाल कुटुंबाचा जल्लोष; मृत अश्विनीच्या वडिलांचा संताप, जामीन रद्द करण्याची मागणी

Wednesday, 27 May 2026, 20:26
Next Post

बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात धूळ खात पडलेल्या वाहनांना अखेर 'घरचा रस्ता' ; धूळ खात पडलेली 13 वाहने मूळ मालकांच्या स्वाधीन, 5 लाखांचा मुद्देमाल परत, आणखी 50 वाहनांचा शोध सुरू..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.