Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात धूळ खात पडलेल्या वाहनांना अखेर ‘घरचा रस्ता’ ; धूळ खात पडलेली 13 वाहने मूळ मालकांच्या स्वाधीन, 5 लाखांचा मुद्देमाल परत, आणखी 50 वाहनांचा शोध सुरू..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 28 May 2026, 11:52

बारामती, (पुणे) : पोलीस ठाण्याच्या आवारात गुन्ह्यातील किंवा बेवारस अवस्थेत वर्षानुवर्षे उन्हापावसात धूळ खात पडून असलेल्या वाहनांना अखेर न्याय मिळाला आहे. बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनने एक विशेष मोहीम राबवून तब्बल 13 बेवारस वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेत ती त्यांच्या स्वाधीन केली आहेत. अशी माहिती बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

पोलिसांच्या या संवेदनशील पुढाकारामुळे अनेक वर्षांपासून आपल्या वाहनांची आशा सोडून बसलेल्या मालकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू उमटले असून, ‘खाकी’प्रती नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. पोलीस ठाण्याच्या परिसरात शेकडो वाहने पडून राहिल्याने जागेची मोठी अडचण निर्माण होते आणि शासनाचा हा मुद्देमाल भंगार बनतो. हीच समस्या ओळखून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष पथकाने मोहीम हाती घेतली.

अनेक वाहनांची अवस्था अतिशय दुरवस्थेत होती, तर काहींचे नंबर प्लेटही गायब होते. अशा परिस्थितीत पोलिसांनी अत्यंत चिकाटीने वाहनांचे इंजिन नंबर आणि चेसिस नंबर गोळा केले. त्यानंतर आरटीओ (RTO) नोंदी, जुने गुन्हे रेकॉर्ड आणि कागदपत्रांची कसून पडताळणी करत थेट मालकांचे पत्ते शोधून काढले आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून 5 लाख 20 हजार रुपये किमतीची 13 वाहने त्यांच्या ताब्यात दिली.

बाळासाहेब आल्हाट (रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती) | MH-42 X-1912, किशोर दळवी (रा. दहिगाव, ता. माळशिरस) | MH-45 Z-2285, विशाल निंबाळकर (रा. फरतडवाडी, ता. फलटण) MH-11 BF-8469, शरद भगवान गरुड (रा. वाल्हे, ता. पुरंदर) | MH-12 GJ-2373, किरण सतीश जराड (रा. माळेगाव बुद्रुक शिवनगर, ता. बारामती) | MH-42 AK-3270, रामदास धोंडीबा चव्हाण (रा. काळेवाडी, ता. दौंड) | MH-42 R-2079, कुंडलिक जयसिंग घोरपडे (रा. कोळविहिरे, ता. पुरंदर) | MH-12 GY-2034, अमर आजिनाथ भोसले (रा. झारगडवाडी, ता. बारामती) | MH-42 AL-5526, सुनील दत्तात्रय कोकणे (रा. झारगडवाडी, ता. बारामती) | MH-42 AL-4162, सदाशिव विश्वनाथ कोठाळे (रा. गोखळी, ता. फलटण), MH-11 CR-3374, अण्णा उत्तम चव्हाण (रा. कोपर्डी हवेली, ता. कराड) | MH-50 E-7379, राजेंद्र वसंत आटोळे (रा. गोखळी, ता. फलटण) | MH-42 AC-3771, नंदकुमार कोंडीबा लोंढे (रा. देऊळगाव रसाळ, ता. बारामती) | MH-42 U-6205 अशी वाहन मालकांची नावे आहेत.

 

याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले, “पोलीस ठाण्याच्या आवारातील 13 वाहने आम्ही मूळ मालकांना मिळवून दिली आहेत. ही केवळ सुरुवात आहे. येत्या काही दिवसांत आणखी 50 बेवारस वाहनांचा तांत्रिक शोध घेऊन तीही त्यांच्या खऱ्या मालकांच्या स्वाधीन करण्यासाठी आमची प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, हवालदार कल्याण शिंगाडे, भारती खंडागळे, नितीन ढवन आणि निलेश वाकळे यांच्या पथकाने केली आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

शंभर टक्के एफआरपी दिल्याशिवाय साखर कारखान्यांना गाळप परवाना नाही! २०२६-२७ हंगामासाठी आयुक्तालयाचा कडक पवित्रा

Sunday, 30 August 2026, 15:56

“मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, ‘हा निर्णय…’”

Sunday, 30 August 2026, 15:50

“शरद पवारांवर अन्याय झाला, राष्ट्रवादी एकत्रच आहे” सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

Sunday, 30 August 2026, 15:25

बँक ग्राहकांनो, कामं लवकर उरका! सप्टेंबरमध्ये तब्बल 15 दिवस बँका बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Sunday, 30 August 2026, 15:13

नवऱ्याला सोडून बॉयफ्रेंडकडे आली अन् त्यानंच केला घात! दारूच्या दुकानासमोरून अपहरण; निर्जनस्थळी मारहाण अन् गरोदर गर्लफ्रेंडला जिवंत जाळलं

Sunday, 30 August 2026, 15:00

पुणे ग्रँड टूरसाठी रस्त्यांना मिळणार नवा लूक! 1 सप्टेंबरपासून कामाला सुरुवात; डिसेंबरपर्यंत रस्ते चकाचक

Sunday, 30 August 2026, 14:22
Next Post

Leistungsbewertung der Plattform von AmonBet Casino für österreichische Nutzer

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp