शुभम वाकचौरे
Junnar News : जांबूत : नारायणगाव (ता. जुन्नर) येथील बस स्टँडमधून संतोष पोपट बुळे (रा. कोपर मांडवे, ता. जुन्नर) यांचा मोबाईल चोरी झाल्याबद्दल नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फीरवून चोरलेला मोबाईल हस्तगत केला.
नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे,(Junnar News ) पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील, पोलीस हवालदार रमेश काटे, पोलीस शिपाई संतोष साळुंखे, पोलीस शिपाई केळकर, होमगार्ड सातपुते यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट दिली. बस स्टॅन्डवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
या वेळी संबंधित गुन्ह्यातील दोन संशयित विकास मालसिंग जाधव (रा. चचेरिया, ता. सेंधवा, जि. बिडवणी) व अर्जुन नामदेव आढाव (रा. अवसरी खुर्द, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. (Junnar News ) आरोपीने चोरलेला मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार रमेश काटे करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Junnar News : बेकायदा गावठी पिस्तूल वापरणाऱ्याला नारायणगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या