Judgment of the court पुणे : घरगुती कारणावरुन झालेल्या भांडणामध्ये पत्नीच्या डोक्यात लोखंडी राॅडने वार करत पत्नीला जखमी केले. यात पत्नीचा मृत्यू झाला. (Judgment of the court) पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच पाच हजार रुपये दंड आकारण्याचे आदेश दिले. दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. हा आदेश पी पी जाधव न्यायालयाने दिला. (Judgment of the court)
रमाबाई ज्ञानेश्वर गायकवाड (वय 35, रा. भिमनगर, विश्रांतवाडी) असे मयत पत्नीचे नाव आहे. ज्ञानेश्वर आण्णा गायकवाड (वय 32, रा.भीमनगर, विश्रांतवाडी) असे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
घरगुती कारणातून भांडण झाले असून आरोपीने त्याच्या पत्नीला मारहाण केली असल्याची फिर्याद विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक सोपान अगतराव नरळे (वय 30) यांनी 20/07/2019 रोजी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवरा ज्ञानेश्वर हा घरी आला असता ‘मला तु काय काम करते, चल उठ वर बस’ असे म्हणाला. त्याची पत्नी वर न बसल्याने त्याचा राग आल्याने त्याने लोखंडी राॅडने डोक्यात व हातावर मारून पळून गेला. असा जबाब रमाबाई यांनी दिला होता. दरम्यान गंभीर जखमी केल्याने तिच्यावर उपचार सुरु असताना रमाबाई गायकवाड यांचा 21/07/2019 रोजी रात्री 1.30 वाजता उपचारा दरम्यान मृत्यु झाला. त्यामुळे आरोपी ज्ञानेर आण्णा गायकवाड याने मयत रमाबाई गायकवाड हिस मारहाण करून गंभीर जखमी करून जिवे ठार केले.
दरम्यान, या खटल्यात सरकारी वकील नामदेव तरळगटटी यांनी कामकाज पहिले तर त्यांना पोलीस हवालदार एन पी पाटील यांनी मदत केली.