Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar News : गोष्ट एका लग्नाची… मंगलाष्टकांऐवजी छत्रपतीच्या आरतीची.! वरातीमधल्या राज्यांच्या पोवाड्याची.!

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Thursday, 29 June 2023, 12:08

Nagar News अहमदनगर : गो ब्राम्हण प्रतिपालक “प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय! “जय भवानी…, जय शिवाजी, हर हर महादेव. एकाच सुरात अशी ललकारी होते.(Nagar News)   वरवधू लग्नमुहर्तावर बहुल्यावर उभे राहातात. मंगलाष्टकांऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती सुरू होते.  (Nagar News) जय भवानी…जय शिवाजी, हर हर महादेव ची गर्जना होताच तुतारी वाजवीत वरवधू एकमेकांच्या गळ्यात हार घालतात. वऱ्हाडी मंडळी देखील टाळ्या वाजवीत या अनोख्या लग्नसमारंभाचे साक्षीदार ठरतात. मंगल वाद्यांनी सारा परीसर दुमदुमून जातो. ही गोष्ट एका लग्नाची…! (Nagar News)

मंगलाष्टकांऐवजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने विवाह सोहळा पार 

लग्नसोहळा, विवाह म्हटलं की हिंदू संस्कृती आणि वैदिक पद्धतीप्रमाणे मंगलाष्टकानेच विवाहाची सुरूवात होते. अहमदनगर येथील गोरक्षनाथ थोरात यांनी आपल्या मुलीच्या लग्नामध्ये मंगलाष्टकांऐवजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने विवाह सोहळा पार पाडला. हिंदू स्वराज्याचे रक्षण करते छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सर्वांसमोर कायम स्मरणात राहावा. तसेच छत्रपती शिवरायांचा आदर्श भावी पिढीने घ्यावा, या उद्देशाने थोरात यांनी आपल्या मुलीच्या लग्नामध्ये मंगलाष्टकाऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून छत्रपती शिवरायांची आरती करून विवाह सोहळा पार पाडला.

विवाह सोहळा पार पडल्यानंतर विवाह सोहळ्यात विविध आर्केस्ट्रामध्ये गायली जाणारी चित्रपटाची गाणी न लावता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील आधारित पोवाडा तसेच स्फूर्ती गीते लावण्यात आली होती. अशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून तसेच स्फूर्ती गीते लावून होणारा विवाह सोहळा अहमदनगर शहरातच नाही तर जिल्ह्यातील हा पहिला विवाह सोहळा आहे. तसेच विवाह सोहळ्यामध्ये आलेले मान्यवर पाहुणे यांचा सत्कार करणे हे नित्याचे ठरले आहे. परंतु थोरात कुटुंबीयांनी या सर्व सत्कारांना फाटा देत त्यावर होणाऱ्या खर्चाची बचत करून तो पैसा शिक्षण संस्था आणि विविध मंदिरांना सुख सोयीसाठी दान करण्यात आला.

 

यातून शैक्षणिक संस्थांना दिलेला पैसा विद्यार्थी घडवण्यासाठी कामाला येईल. तसेच मंदिरांसाठी दान केलेला पैसा हा येणाऱ्या भाविकांसाठी तसेच इतर सामाजिक कार्यासाठी उपयोगी पडेल, या हेतूने हे दान करण्यात आले आहे. आज-काल लग्न म्हटले की डीजेच्या कर्कश आवाजावर वाजणारी गाणी आणि ऑर्केस्ट्रा तसेच इतर विविध प्रकारची मनोरंजनाची साधने लग्न कार्यामध्ये केली जातात. त्यातून ह्दयविकाराचे झटके येऊन काहिना जीव गमवावा लागला असल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु थोरात यांनी अशा विवाह सोहळ्याला फाटा दिला आहे. आगळावेगळा आणि सर्व समाजापुढे आदर्श ठेवणारा असा शाही विवाह सोहळा अहमदनगर शहरांमध्ये पाहायला मिळाला.

मंगलाष्टका ऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची स्फूर्ती गीते लावून लग्न लावण्यात आले. या विवाह सोहळ्याची सध्या सोशल मीडिया चांगलीच जोरदार चर्चा सुरू असून लग्नाच्या वेगळा पायंडा थोरात आणि धिसले परिवाराने पाडला आहे.

समाजातील इतर घटकांनीही थोरात आणि धिसले परिवाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारे विवाह सोहळा साजरे केल्याने होणारा अनावश्यक खर्चही टाळेल. तसेच समाजापुढे एक आदर्श घडून येणारी ही पिढी सुसंस्कृत आणि समाजकारणामध्ये चांगले काम करणारी घडेल. सध्याच्या काळामध्ये समाजामध्ये जातीय राजकारण आणि भांडणं होत आहेत. ती भांडणे किंवा दंगे असे विवाह सोहळे पार पडल्याने कुठेतरी संपुष्टात येतील. असेही थोरात यांनी सांगितले.

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38
Next Post

Judgment of the court : पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.