Jalgaon News : जळगाव : महाराष्ट्र पोलिस दलातून निलंबीत केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाने (पीएसआय) बापाला आणि पाहुण्याला हाताशी धरून जळगावातील कालिंका माता मंदिराशेजारील स्टेट बँक ऑफ इंडियावर दरोड्याचा घाट घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (The police officer became the ‘mastermind’ of the robbery.)
बापाला अन् पाहुण्याला हाताशी धरून घातला जळगावातील स्टेट बँकेवर दरोडयाचा घाट
याप्रकरणी जळगाव पोलिसांनी संशयित पोलिस उपनिरीक्षकासह त्याच्या बापाला आणि पाहुण्याला बेड्या ठोकल्या आहेत. (Jalgaon News) त्यांच्याकडून पोलिसांनी रोख 16 लाखासह 3 कोटी 60 लाखांचे सोने जप्त केले आहे.
संशयित निलंबीत पोलिस उपनिरीक्षक शंकर रमेश जासक (रा. कर्जत), रमेश राजाराम जासक (रा. मन्यारखेडा) आणि जासकचा पाहुणा व बँकेतील ऑफिस बॉय मनोज रमेश सुर्यवंशी अशी त्यांची नावे आहेत. (Jalgaon News)
मिळालेल्या माहितीनुसार, शंकर जासक हा ऑक्टोबर 2021 पासून कामावरून गायब होता. गुरूवारी (ता.१) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हेल्मेट परिधान केलेल्या चोरटयांनी बँकेमध्ये मागच्या दरवाजातून प्रवेश केला होता. त्यांनी ऑफीस बॉय मनोज सुर्यवंशी आणि सुरक्षारक्षक संजय बोखारे यांच्या डोळयात स्प्रे मारून तसेच त्यांना मारहाण करून त्यांना बांधून ठेवले होते. (Jalgaon News) इतरांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत एका ठिकाणी बसवले होते. त्यांनी बँकेतून 17 लाख आणि 3 कोटी 60 लाख रूपये किंमतीचे सोने लंपास केले होते.
घडलेल्या गंभीर घटनेची दखल पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी घेतली आणि युध्दपातळीवर तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. पोलिसांच्या तपासादरम्यान बँक मॅनेजर आणि ऑफीस बॉय मनोज सुर्यवंशी यांच्याकडे वेगवेगळी विचारपूस केली असता त्यांच्या जबाबामध्ये कमालीचा फरक जाणवला. (Jalgaon News) त्यानंतर पोलिसांनी मनोज सुर्यवंशीकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदरील उद्योग हा मुहेणा शंकर जासक आणि त्याचा बाप रमेश जासक यांनी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी जासक बाप-लेकाला अटक केली आहे.