पुणे : शहरात गेल्या काही दिवसापासून वारंवार खून,अत्याचार,चोरी, हाणामारी अशा घटना वारंवार घडताना समोर येत आहेत. अशातच पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी (11 मे )रोजी एका तरुणीचा धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना समोर आली होती. या तरुणीच्या हत्येबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंध आणि आर्थिक व्यवहारातून शेजार्याने तिचा खून केल्याच तपासात उघड झालं आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोमल भरत जाधव असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्या हत्याप्रकरणी उदयभान यादव (वय 45) आणि त्याचा सख्खा भाचा यांना पोलिसांनी अटक केली आहे. उदयभान यादव हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी ही कारवाई केली आहे.कोमल जाधव ही तरुणी पिंपरी चिंचवड परिसरात असलेल्या वाल्हेकरवाडीत कुटुंबासोबत राहत होती. कृष्णामाई परिसरात तिचे घर आहे. रविवारी कोमल घरात होती. यादव हा तिच्याच शेजारी रहायला होता. त्या दोघांमध्ये संबंध होते तसेच त्यांच्यात आर्थिक व्यवहारातून वाद झाले होते. त्यामुळे उदयभान याने कोमल हिला संपवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्याने आपल्या भाच्याच्या मदतीने रविवारी रात्री दुचाकीवरून डोक्यात हेल्मेट घालून कोमलला घराच्याबाहेर बोलावून घेतले. जशी कोमल घराच्या खाली आली तसा तिच्यावर शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात कोमलचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. त्यांनी अवघ्या काही तासांतच आरोपींना बेड्या ठोकल्या.