Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur Crime News : वालचंदनगर येथे आंतरजातीय विवाहाच्या रागातून सासू, सून व नातेवाईकांना घरात घुसून बेदम मारहाण ; जीवे मारण्याची दिली धमकी, 7 जणांवर गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 4 May 2026, 16:39

Indapur Crime News : वालचंदनगर, (पुणे) : आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून नातेवाईकांनीच सूडापोटी एका कुटुंबावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील कळंब लक्ष्मीनगर येथे घडली आहे. आरोपींनी घरात अनाधिकाराने प्रवेश करून फिर्यादी महिला, तिची सासू, आई आणि बहिणीला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी सात जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. हि घटना शनिवारी (ता. 02) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. Indapur Crime News

याप्रकरणी आरती चैतन्यमाळ शिकारे (वय 23) यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शशिकांत बापूराव निकाळजे, निलांबरी शशिकांत निकाळजे, निशिता शशिकांत निकाळजे, दिपाली प्रशांत शिंदे, कमल महादेव शिंदे, सुवर्णा आनंद निकाळजे आणि अश्विनी जयदेव सोरटे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. Indapur Crime News

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आरती शिकारे यांनी प्रेमविवाह केला आहे. मात्र, हा आंतरजातीय विवाह नातेवाईक असलेल्या निकाळजे आणि शिंदे कुटुंबाला मान्य नव्हता. याच रागातून शनिवारी (ता. 02) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपींनी आरती यांच्या घरात शिरून धुमाकूळ घातला. Indapur Crime News

आरोपी शशिकांत आणि निलांबरी निकाळजे यांनी आरती यांना शिवीगाळ करत “तुला जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी दिली. त्यानंतर आरती यांच्या सासूला लाकडी दांडक्याने मारहाण करून घराबाहेर ओढले. आरडाओरडा ऐकून आरती यांची आई आणि बहीण सोडवण्यासाठी आल्या असता, सर्व सातही आरोपींनी मिळून महिलांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारले. झटापटीत सासू सुरेखा यांच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र तुटले असता, मुख्य आरोपी शशिकांत निकाळजे याने ते हिसकावून स्वतःच्या खिशात ठेवले आणि परत देण्यास नकार दिला. Indapur Crime News

दरम्यान, तसेच आरोपींनी आरती आणि त्यांच्या पतीला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली. या घटनेमुळे पीडित कुटुंब प्रचंड दहशतीखाली आहे. याप्रकरणी आरती शिकारे यांच्या फिर्यादीवरून वालचंदनगर पोलिसांनी वरील आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ११८(१), ११९(१), ३३३, ७४, ३५२, ३५१(१) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहे. Indapur Crime News

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34

Weather Report: पुणेकरांची प्रतीक्षा संपली! अखेर पावसाचा मुहूर्त ठरला; पुढील 4 दिवस ‘यलो अलर्ट’, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Sunday, 7 June 2026, 12:15
Weather Update

Monsoon News : आनंदवार्ता! मोसमी वाऱ्यांची तळकोकणात दमदार एंट्री; पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा संपणार?

Sunday, 7 June 2026, 12:07

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11
Next Post

Indapur News : यात्रेत सुट्ट्या पैशांच्या वादातून तरुणाचा मृत्यू; आईस्क्रीम विक्रेत्यावर खुनाचा गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.