लहू चव्हाण
Pachagani News : पाचगणी – वाई मुख्य रस्त्यावर गाडी आडवी लावून अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकावर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना पाचगणी शहरातील लक्की बेकरीसमोर शुक्रवारी (ता..२८ जुलै) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे.(Pachagani News)
एकावर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
गणेश रोहिदास लाळगे (वय ३४, व्यवसाय ड्रायव्हर, रा. दक्षिण वाडी, मराठी केंद्र शाळा देव्हारे, तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार नितीश मुगुटराव भोसले यांनी सरकारच्या वतीने पाचगणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pachagani News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश लाळगे याने त्याच्या ताब्यातील छोटा हत्ती (गाडी क्रमांक MH. 08 AP 1543) हा सार्वजनिक रस्त्यावर लावला होता. यामुळे लोकांचे जीवितास धोका व रहदारीसाठी अडथळा निर्माण झाला होता.(Pachagani News)
याप्रकरणी पोलिस हवालदार नितीश मुगुटराव भोसले यांनी सरकारच्या वतीने पाचगणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी गणेश लाळगे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाचगणी पोलीस करीत आहे.(Pachagani News)