Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : चेहरा स्कॅन करून मिळवा पुण्याच्या लोहगाव विमानतळावर प्रवेश ; ‘डिजि यात्रा’चे उड्डाण सुसाट…!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 30 July 2023, 14:29

Pune News :  पुणे : सुरक्षेसंबंधित कारणांमुळे विमानतळावर एका प्रवाशाच्या कागदपत्रांची साधारणपणे तीन वेळा तपासणी होते. यामुळेच प्रवाशांना किमान दोन तास आधी विमानतळावर पोहोचण्याची सूचना करण्यात येत असते. प्रवाशांचा हाच वेळ वाचवण्यासाठी केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने डिजीयात्रा नामक एक नवीन प्रणाली विकसित केली आहे. या तंत्रज्ञानामुळे प्रवाशांचा बराच वेळ वाचेल, तसंच सुरक्षारक्षकाकडे कागदपत्रे तपासण्याची गरज भासणार नाही, असे मंत्रालयाने म्हटले आहे. दुसऱ्या टप्प्यात ही सेवा पुणे विमानतळावर (लोहगाव) सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना सुलभ ‘चेक-इन’साठी सुरू केलेल्या ‘डिजि यात्रा’ सुविधेचा वापर २५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या महिन्यात या सुविधेच्या वापराच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाली असून, पुणे हे देशातील सात शहरांमध्ये तिसरे शहर ठरले आहे. विमानतळावर प्रवेशासाठी ‘प्रवाशांचा चेहरा हाच पासपोर्ट,’ अशी सेवा असलेली ‘डिजि यात्रा’ सुविधा नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सुरू केली आहे.(Pune News)

डिजीयात्रा नामक एक नवीन प्रणाली विकसित.

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी नुकतेच देशातील तीन विमानतळांसाठी ‘डिजी यात्रा’ प्रणालीचा शुभारंभ केला. ही सुविधा पहिल्या टप्प्यात दिल्ली, वाराणसी, बंगळुरू येथे प्रायोगिक तत्त्वावर डिसेंबर २०२२मध्ये सुरू करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात पुणे, वाराणसी, कोलकता, दिल्ली, हैदराबाद, विजयवाडा येथील विमानातळावर तिचा वापर सुरू झाला. एक एप्रिलपासून ही सुविधा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली. या सुविधेमुळे गर्दी असणाऱ्या विमानतळांवर प्रवाशांना दिलासा मिळतो.(Pune News)

‘डिजी यात्रा’ प्रणाली काय आहे?
देशातील तीन विमानतळांवर फेस रिकग्निशन टेक्नोलॉजी (FRT) अर्थात चेहरा ओळख प्रणाली लागू करण्यात आली आहे. ही प्रणाली वापरण्यासाठी आपल्याला एका मोबाईल अॅपचा वापर करावा लागणार आहे. या तंत्रज्ञानाला एकत्रित स्वरुपात डिजी यात्रा प्रणाली असे नाव देण्यात आले आहे.(Pune News)   डिजी यात्रा प्रणालीचा वापर केल्यास प्रवाशांना विमानतळावरील गेटवर कोणतीही कागदपत्रे न दाखवता थेट प्रवेश मिळू शकतो. यामध्ये आपल्या आधारकार्डवरील माहिती, तसंच आपण प्रवासापूर्वी अपलोड केलेली माहिती यांचा उपयोग करण्यात येईल. सध्या तरी ही सेवा केवळ देशांतर्गत प्रवाशांसाठीच सुरु करण्यात आली आहे. प्रवासी ‘सिक्युरिटी चेक-इन’ करताना सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सचे (सीआयएसएफ) जवान संबंधित प्रवाशाचे स्‍कॅन केलेले छायाचित्र आणि तिकिटाची पडताळणी(Pune News)  करतात. यामध्ये प्रवाशांचा वेळ वाचतो.

 

कोणत्या विमानतळांवर मिळणार सुविधा?
डिजी यात्रा प्रणालीमार्फत विमानतळावर थेट चेहरा स्कॅन करून प्रवेश देण्याची सुविधेची सुरुवात पहिल्या टप्प्यात देशातील ७ विमानतळांवर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याचा शुभारंभ दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन १ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आला. दिल्लीसह वाराणसी आणि बंगळुरू या शहरांच्या विमानतळांवरही चेहरा स्कॅन करून प्रवेश देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यानंतर मार्च २०२३ पर्यंत ही प्रणाली हैदराबाद, कोलकाता, पुणे आणि विजयवाडा या ४ विमानतळांवर सुरू करण्यात येईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशभरातील इतर काही विमानतळांवर ही प्रणाली सुरु करण्यात येणार आहे.(Pune News)

याबाबत बोलताना लोहगाव विमानतळाचे संचालक संतोष डोके म्हणाले की, पुण्यातून दिवसाला १८० उड्डाणे होतात. त्याद्वारे २६ ते २८ हजार प्रवासी प्रवास करतात. जून अखेरपर्यंत पुणे विमानतळावर १,०४,००० प्रवाशांनी डिजि यात्रा अॅपचा वापर केला. हे प्रमाण एकूण प्रवाशांच्या तुलनेत ११.९० टक्के होते; पण, जुलैमध्ये ते २५ टक्क्यांपर्यंत वाढले. पुणे विमानतळावर दोन विमान कंपन्यांकडून डिजि यात्रा सुविधेचा वापर अद्याप केला जात नाही. त्यांना ही सुविधेसाठी परवानगी मिळाल्यास ती वापरणाऱ्यांची संख्या आणखी वाढेल. पुणे विमानतळावरील दोन प्रवेशद्वारांवर ‘डिजि यात्रा’ सेवा सुरू आहे. सध्या दिवसाला २५ टक्क्यांपेक्षा अधिक जास्त नागरिक डीजी यात्रा सुविधेचा वापर करत आहेत. येत्या काळात ही सेवा वापरणाऱ्यांची संख्या निश्चित वाढेल.(Pune News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06
Next Post

Pachagani News : पाचगणीत मुख्य रस्त्यावर गाडी आडवी लावल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.