Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 5 July 2026, 10:40

पुणे : लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून करण्यात आलेल्या केतन अग्रवाल या तरुण बांधकाम व्यावसायिकाच्या हत्या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले आहे. या खळबळजनक प्रकरणात वडगाव मावळ सत्र न्यायालयात नुकतीच सुनावणी पार पडली. न्यायालयाने आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांचीही 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या सुनावणीदरम्यान सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नार्को टेस्टबाबत न्यायालयात महत्त्वाची चर्चा झाली.

न्यायालयाने असे स्पष्ट केले आहे कि, जोपर्यंत आरोपी स्वतःहून नार्को चाचणीसाठी आपली संमती देत नाहीत, तोपर्यंत अशी टेस्ट करता येणार नाही.दरम्यान, सरकारी वकिलांनीही सध्याच्या घडीला नार्को टेस्टची कोणतीही आवश्यकता नसल्याचे न्यायालयात सांगितले. आरोपींच्या वतीने वकील विपुल दुशिंग यांनी बाजू मांडली की, सियाने पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य केले आहे आणि मोबाईलमधील डेटा तपासण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याची गरज नाही.

सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले की, सियाचा दुसरा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्यातील डिलीट केलेला डेटा पोलिसांनी परत मिळवला आहे. या फोनमधील चॅटिंगमध्ये सिया आणि चेतन यांनी सांकेतिक भाषेचा वापर केला असून, ते संभाषण उलगडण्यासाठी दोघांची समोरासमोर चौकशी करणे गरजेचे आहे.

 

या संपूर्ण मोबाईल डेटा आणि चॅटिंगची कायदेशीर सत्यता तपासण्यासाठी फॉरेन्सिक लॅबचा (न्यायवैद्यक शास्त्र) अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, हा अहवाल आल्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.यातून आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53

व्हाट्सअँप डीपीवर कंपनी संचालकाचा फोटो लावून 20 लाखांची फसवणूक; राजगड पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 25 July 2026, 20:42

नसरापूर येथे मद्यधुंद अवस्थेत कार चालविणाऱ्या चालकावर राजगड पोलिसांची कारवाई

Saturday, 25 July 2026, 20:35
Next Post

Echtzeit-Casinospiele: Was für Möglichkeiten bietet Westace Casino in der Bundesrepublik?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.