पाचगणी : वाई -पाचगणी रस्त्यावरील पसरणी घाटात अज्ञात चार चोरट्यांनी दुचाकीवरुन पाठलाग करून चारचाकी वाहन चालकाला अडवून २५ हजार रुपये किमतीचे सोने लुटून नेल्याची घटना घडली आहे. या सर्व प्रकाराने वाई पाचगणी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी शुभम दत्तात्रय वांगडे (वय -२३ रा. पिंपरी पो. कुसुंबी, ता. जावळी, जि. सातारा) यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चार चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर फिरवण्यासाठी शुभम वांगडे व त्यांच्या दोन बहिणी सुप्रिया लक्ष्मण वाघ, नीलम लक्ष्मण वाघ, (दोघीही रा. मेढा) या वाईवरून पाचगणीच्या दिशेने निघाले होते. यावेळी थापा पॉईंटच्या पाठीमागील बाजूकडून दोन वेगवेगळ्या मोटरसायकलवरून २५ ते ३० वयोगटातील अज्ञात चौघेजण आले व त्यांनी शुभम चालवीत असलेल्या चारचाकी गाडीला दोन दुचाकी गाड्या आडव्या लावल्या. यावेळी आमची चप्पल तुटली आहे तुला वाहन नीट चालवता येत नाही असे म्हणीत शुभम याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून बहीण सुप्रिया हिच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरीने चोरून घेऊन पळून गेले.
याप्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात अज्ञात चार चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाकःल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस
निरीक्षक सतीश पवार करत आहेत.