Hadapsar News : पुणे : पतीच्या मृत्यूनंतर महिला आणि मुलाने विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी भागातील भोसले व्हिलेज सोसायटीत घडली. पुण्यातील फुरसुंगी येथे एका ७० वर्षीय वृद्धाच्या आत्महत्येनंतर महिन्याभरातच पत्नी आणि मुलानेही आत्महत्या केली आहे. (Hadapsar News)
धक्कादायक बाब म्हणजे महिनाभरापूर्वी तिघांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यातून आई आणि मुलगा बचावले होते. तर वडिलांचा मृत्यू झाला. मात्र, सोमवारी (ता. २६ जून) दुपारी आई आणि मुलाचा मृतदेह राहत्या घरी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. आई आणि मुलाने पुन्हा विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Hadapsar News)
जनाबाई सूर्यप्रकाश अबनावे ( वय ६०) आणि चेतन सूर्यप्रकाश अबनावे (वय ४१) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. २२ मे रोजी सूर्यप्रकाश हरिश्चंद्र अबनावे (वय ७०, रा. लक्ष्मी निवास, फुरसुंगी) यांनी त्यांची पत्नी जनाबाई, मुलगा चेतन यांनी विषारी ओैषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तिघांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Hadapsar News)
उपचारादरम्यान सूर्यप्रकाश यांचा मृत्यू झाला होता. तर उपचारानंतर जनाबाई आणि त्यांचा मुलगा चेतन यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र सोमवारी दोघांनी पुन्हा विषारी ओैषध पिऊन पुन्हा आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. (Hadapsar News)
याबाबत पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सोमवारी दुपारच्या सुमारास आई आणि मुलगा त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळले होते. प्राथमिक तपासणीत त्यांनी विषारी पदार्थाचे सेवन केल्याचे निदर्शनास आले आहे. आम्ही घटनांच्या क्रमाची चौकशी सुरू केली आहे, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.” एक महिन्यापूर्वी केलेल्या पोलीस तपासात आर्थिक व आरोग्याच्या त्रासाला कंटाळून या कुटुंबाने विषारी द्रव्य प्राशन करून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे निष्पन्न झाले होते. (Hadapsar News)
दरम्यान, जनाबाई यांचे पती सूर्यप्रकाश यांनी मे महिन्यात आत्महत्या केल्यानंतर कुटुंबाची चौकशी केली असता, जनाबाई कॅन्सर या रोगाशी झुंज देत होत्या आणि घटस्फोट आणि नोकरी गेल्याने चेतन तणावाखाली असल्याचे दिसून आले होते, अशीही माहिती पोलिसांनी दिली. “मे महिन्यात त्यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर, आई आणि मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर त्यांना सोडण्यात आले. (Hadapsar News)
दरम्यान, सोमवारी दुपारी त्यांचा मृत्यू उघडकीस येण्यापूर्वीच दोघांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे दिसते, असे हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी सांगितले. कौटुंबिक समस्या, तसेच आजारपणामुळे एकाच कुटुंबातील तिघांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली. पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. (Hadapsar News)