Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हृदयद्रावक..! फुरसुंगी हादरले.. पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीसह मुलानेही संपवले जीवन ; परिसरात हळहळ..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 27 June 2023, 11:32

Hadapsar News : पुणे : पतीच्या मृत्यूनंतर महिला आणि मुलाने विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी भागातील भोसले व्हिलेज सोसायटीत घडली. पुण्यातील फुरसुंगी येथे एका ७० वर्षीय वृद्धाच्या आत्महत्येनंतर महिन्याभरातच पत्नी आणि मुलानेही आत्महत्या केली आहे.  (Hadapsar News)

धक्कादायक बाब म्हणजे महिनाभरापूर्वी तिघांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यातून आई आणि मुलगा बचावले होते. तर वडिलांचा मृत्यू झाला. मात्र, सोमवारी (ता. २६ जून) दुपारी आई आणि मुलाचा मृतदेह राहत्या घरी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. आई आणि मुलाने पुन्हा विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Hadapsar News)

जनाबाई सूर्यप्रकाश अबनावे ( वय ६०) आणि चेतन सूर्यप्रकाश अबनावे (वय ४१) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. २२ मे रोजी सूर्यप्रकाश हरिश्चंद्र अबनावे (वय ७०, रा. लक्ष्मी निवास, फुरसुंगी) यांनी त्यांची पत्नी जनाबाई, मुलगा चेतन यांनी विषारी ओैषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तिघांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  (Hadapsar News)

 

उपचारादरम्यान सूर्यप्रकाश यांचा मृत्यू झाला होता. तर उपचारानंतर जनाबाई आणि त्यांचा मुलगा चेतन यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र सोमवारी दोघांनी पुन्हा विषारी ओैषध पिऊन पुन्हा आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. (Hadapsar News)

याबाबत पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सोमवारी दुपारच्या सुमारास आई आणि मुलगा त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळले होते. प्राथमिक तपासणीत त्यांनी विषारी पदार्थाचे सेवन केल्याचे निदर्शनास आले आहे. आम्ही घटनांच्या क्रमाची चौकशी सुरू केली आहे, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.” एक महिन्यापूर्वी केलेल्या पोलीस तपासात आर्थिक व आरोग्याच्या त्रासाला कंटाळून या कुटुंबाने विषारी द्रव्य प्राशन करून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे निष्पन्न झाले होते. (Hadapsar News)

दरम्यान, जनाबाई यांचे पती सूर्यप्रकाश यांनी मे महिन्यात आत्महत्या केल्यानंतर कुटुंबाची चौकशी केली असता, जनाबाई कॅन्सर या रोगाशी झुंज देत होत्या आणि घटस्फोट आणि नोकरी गेल्याने चेतन तणावाखाली असल्याचे दिसून आले होते, अशीही माहिती पोलिसांनी दिली. “मे महिन्यात त्यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर, आई आणि मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर त्यांना सोडण्यात आले.  (Hadapsar News)

दरम्यान, सोमवारी दुपारी त्यांचा मृत्यू उघडकीस येण्यापूर्वीच दोघांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे दिसते, असे हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी सांगितले. कौटुंबिक समस्या, तसेच आजारपणामुळे एकाच कुटुंबातील तिघांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली. पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. (Hadapsar News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40
Next Post

Pune News : पुण्यात कोयता गँगची दहशत कायम ! अरण्येश्वर भागात दहशत, वाहनांची तोडफोड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.