Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 5 July 2026, 13:09

पुणे : पुणे आतरंराष्ट्रीय विमानतळावर नुकतीच एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. पुणे -जयपूर मार्गांवरील एअर इंडिया एक्सप्रेस हे विमान उड्डाणासाठी धावपटीवर वेगाने धावत अचानक भटका कुत्रा समोर आल्यामुळे पायलटला अगदी शेवटच्या क्षणी इमर्जन्सी ब्रेक लावावा लागला. या घटनेमुळे विमानातील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पायलटच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.

ही घटना शुक्रवारी दुपारी 3:15 वाजता घडली. एअर इंडिया एक्सप्रेसचे हे विमान एकूण 120 प्रवाशांना घेऊन जयपूरसाठी उड्डाण करणार होते. विमानाने धावपट्टीवर वेग घेतला होता, तितक्यात एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या कर्मचाऱ्यांना तिथे एक कुत्रा फिरताना दिसला. त्यांनी ताबडतोब धोक्याची सूचना दिल्यानंतर पायलटने तातडीने ब्रेक दाबले. अचानक लागलेल्या या जोरदार ब्रेकमुळे विमानातील प्रवासी घाबरले आणि आतमध्ये काही वेळ गोंधळ उडाला.

ब्रेक लावल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून विमानाची संपूर्ण तांत्रिक तपासणी करण्यात आली. सर्व यंत्रणा सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यावर, सुमारे 100 मिनिटांच्या उशाराने म्हणजेच दुपारी 4:55 वाजता विमानाने जयपूरसाठी यशस्वी उड्डाण केले. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

 

विशेष म्हणजे, पुणे विमानतळावर अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 28 जून रोजी देखील भुवनेश्वरहून आलेल्या एका विमानासमोर कुत्रा आल्यामुळे वैमानिकाला ‘गो-अराउंड’ करावे लागले होते.

आता लागोपाठ घडणाऱ्या या प्रकारांमुळे आता पुणे विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि तिथे असणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या वावरावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.