लोणी काळभोर : हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट सुरू असून, अनेक हॉटेल व्यावसायिक, कॅटरर्स व इतर व्यावसायिक एजंटांकडून गॅस सिलेंडर खरेदी करत असल्याचे समोर आले आहे. मात्र, अशा अनधिकृत सिलेंडरमुळे एखादी दुर्घटना घडल्यास ग्राहकांना कोणतीही कायदेशीर मदत, विमा संरक्षण किंवा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळत नाही. त्यामुळे व्यावसायिक वापरासाठी गॅस सिलेंडर खरेदी करताना केवळ अधिकृत वितरकाकडूनच सिलेंडर घ्यावेत, असे आवाहन पाषाणकर गॅस एजन्सीचे भागीदार राहुल क्षीरसागर यांनी केले आहे.

राहुल क्षीरसागर म्हणाले की, हिंदुस्थान पेट्रोलियम (HP)च्या अधिकृत डीलरकडून मिळणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये पूर्ण वजनाची हमी दिली जाते. तसेच प्रत्येक व्यवहारासोबत पक्के बिल दिले जात असल्याने व्यवहार पूर्णपणे पारदर्शक राहतो. अधिकृत वितरण व्यवस्थेमुळे ग्राहकांना दर्जेदार सेवा, वेळेवर डिलिव्हरी आणि सुरक्षित गॅस पुरवठ्याची खात्री मिळते.

ते पुढे म्हणाले की, हिंदुस्थान पेट्रोलियमच्या सुरक्षा निकषांनुसार प्रत्येक सिलेंडरची नियमित तपासणी केली जाते. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरिंग व्यवसाय तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण गॅसचा पुरवठा होतो. अधिकृत एजन्सीकडून गॅस घेणे हे केवळ कायदेशीरच नव्हे, तर व्यवसायाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहे.
याउलट, एजंटमार्फत किंवा अनधिकृत मार्गाने गॅस सिलेंडर खरेदी करणे धोकादायक ठरू शकते. अशा सिलेंडरमुळे आग, स्फोट किंवा अन्य दुर्घटना घडल्यास संबंधित ग्राहकांना कंपनीकडून कोणतीही मदत, सुरक्षा लाभ किंवा विमा संरक्षण मिळत नाही. त्यामुळे काही रुपयांच्या बचतीसाठी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहनही राहुल क्षीरसागर यांनी केले.
पाषाणकर गॅस एजन्सी, लोणी काळभोर येथे व्यावसायिक गॅस सिलेंडरची उपलब्धता असून, ग्राहकांसाठी वेळेवर डिलिव्हरी, पूर्ण वजनाची हमी, पक्के बिल आणि हिंदुस्थान पेट्रोलियमच्या सुरक्षा मानकांनुसार सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. “आपला विश्वास… आमची जबाबदारी!” या ब्रीदवाक्यासह व्यावसायिक ग्राहकांनी सुरक्षित, अधिकृत आणि विश्वासार्ह सेवेलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन पाषाणकर गॅस एजन्सीच्या वतीने करण्यात आले आहे.






