सांगली : पोलिस स्टेशनमध्ये लाच घेणार्या पोलिस उपनिरीक्षकास सांगलीचे पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी तडकाफडकी निलंबीत केले आहे.
रामचंद्र गोसावी असे निलंबीत करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, करगणी येथील सागर जगदाळे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असून खोटी फिर्याद देणार्यांवर कारवाई करण्याची मागणी जगदाळे यांनी पोलीस प्रशासनाकडे केली होती.
पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी यांनी लाच घेतल्याचा व्हिडीओ जगदाळे यांनी अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याकडे दिला होता. त्यानंतर कठोर कारवाई करत अधीक्षकांनी उपनिरीक्षकास निलंबीत केले आहे.