Hadapsar news : (पुणे) : पूर्ववैमनस्यातून चार ते पाच जणांच्या टोळक्याने एकावर धारदार हत्याराने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी परिसरात घडली आहे. गुरुवारी (ता. १५) मध्यरात्री हि घटना घडली आहे.Hadapsar news
हडपसर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल
वैभव विठ्ठल गायकवाड (२२, रा. वडकी, ता. हवेली) असं हत्या झालेल्याचं नाव आहे. तर प्रतीक कामठे (वय- २२), शुभम गायकवाड (वय – १९), सोन्या पोटे (वय – २२), अनिकेत कटके (वय – २०), स्वराज दोरगे (वय – २१, रा. सर्व, फुरसुंगी) असं गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास फुरसुंगीतील परदेशी माळ येथील मीठाच्या गोडावूनच्या पाठीमागे असलेल्या सुंदरबन सोसायटी रस्त्यावर ही घटना घडली. याबाबत शिवलिंग ज्ञानदेव पांढरे (वय-२०) यांनी फिर्याद दिली आहे.Hadapsar news
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांढरे हा त्याचा मित्र वैभव गायकवाड याला घेऊन दुचाकीवरून फुरसुंगीतील सुंदरबन सोसायटी रस्ता परिसरातून जात होता. त्यावेळी मागून दोन दुचाकीवरून प्रतीक कामठे, शुभम गायकवाड, सोन्या पोटे,(Hadapsar news) अनिकेत कटके, स्वराज दोरगे तेथे आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या रागातून वैभव याच्यावर धारदार हत्याराने वार केले. लाकडी दांडक्याने मारहाण करून वैभवला गंभीर जखमी केले. यातच वैभवचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेनंतर आरोपी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, हडपसर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त आश्विनी राख, पोलीस निरीक्षक विश्वास डगळे यांच्यासह अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह शेळके करत आहेत.(Hadapsar news )