हनुमंत चिकणे
हडपसर, (पुणे) : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगार बाबु नामदेव मिरेकर याच्यासह टोळीतील ७ साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
आरोपि बाबु नामदेव मिरेकर, (वय ५४, वैदुवाडी, हडपसर, पुणे (टोळी प्रमुख), आकाश हनुमंत कांबळे, (वय २०, रा. सदर, अमन नवीन शेख, वय २३, रा. गोसावी वस्ती, हडपसर,) सरताज नबीलाल शेख, (वय २०, रा. वैदवाडी, हडपसर) सनी रावसाहेब कांबळे, वय २३, रा. मिरेकर वस्ती, शंकर मठ, वैदवाडी पुणे) रोहित शंकर हनुवते वय २२, रा. नवीन म्हाडा बिल्डींग, हडपसर, पुणे (टोळी सदस्य) दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असुन ०३ विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हडपसर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, दाखल गुन्हयाचा हडपसर पोलीस व गुन्हे शाखा युनिट ०५ हे समांतर तपास करीत असताना, त्यांना त्यांचे बातमीरादारामार्फत मिळालेल्या बातमीवरुन व सापळा लावुन दाखल गुन्हयातील वरील आरोपींना व तीन विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडे अधिक तपास करीत असताना बाबु नामदेव मिरेकर टोळीविरुद्ध गंभीर दुखापत, मालमत्तेचे नुकसान, नागरिकांमध्ये दहशत माजविणे, प्राणघातक शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
त्यानुसार पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी पोलिस उपायुक्त परिमंडळ ०५ चे विक्रांत देशमुख यांचे मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केलेला होता. रंजनकुमार शर्मा यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून मोका कारवाईस मान्यता दिली. सदर गुन्हयाचा पुढिल तपास हडपसर विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त अश्वीनी राख हे करीत आहेत.
सदरची कामगिरी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, संदिप शिवले, सहायक पोलीस निरीक्षक सारीका जगताप, प्रमोद दोरकर, पोलीस अंमलदार, प्रविण शिंदे, महेश उबाळे, राजश्री खरे, वसीम शेख, गिरीश एकोर्गे, बाबा शिंदे, रामश्वेर नवले यांनी केलेली आहे.