Dhule Crime, धुळे : गेल्या काही दिवसापासून पोलीसांवर हल्ले ( Attacks on the police) होण्याच्या प्रमाणावर वाढ (Increase) झाल्याचे दिसून येत आहे . या घटनांमुळे पोलीस प्रशासनाचा (administration) धाक राहिला की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. अशीच एक धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातून (Dhule District) समोर आली आहे.
जुगार अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीसांच्या (Police) पथकावर २० ते २५ जुगाऱ्यांनी (Gamblers ) हल्ला चडविला आहे. हा प्रकार जिल्हातील वरखेडी (Varkhedi) गावाजवळ रविवारी (Sunday) रात्री घडली आहे. यामध्ये ५ पोलिस किरकोळ जखमी (Minor injuries) झाले आहेत. या घटनेनंतर पोलीस दलात एकच खळबळ (excitement in the police force) उडाली आहे.
पोलीस पथकाच्या या हल्ल्याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात २३ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीसांनी १९ आरोपींना ताब्यात घेत अटक केली आहे. पोलिस कर्मचारी योगेश ठाकूर यांनी फिर्याद दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकास गोपनिय माहितीच्या आधारे वरखेडी गावाजवळ असलेल्या एका मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या घरात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाले. त्यानंतर सापळा लावत पोलिस कर्मचारी तेथे कारवाईसाठी गेले. त्यावेळी तेथे जुगार खेळणार्या जुगारांनी पोलिसांवर हल्ला चढवला. त्यांचे कपडे फाडून त्यांना मारहाण केली. त्यामध्ये 5 पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. पुढील तपास धुळे तालुका पोलीस करत आहेत.