पुणे : ईडी प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, अद्यापही त्यांच्यावर सीबीआयचाही खटला सुरु आहे. त्यांच्या सुटकेबाबत प्रश्नचिन्ह आहे. ईडीकडून दाखल गुन्ह्यात जामीन मंजूर करण्यात आला आहे. पण सीबीआयकडून त्यांची अद्याप सुटका नसल्याचे वकिलांनी सांगितले.
१०० कोटींच्या वसुलीचा आरोप असलेल्या देशमुख यांनी ईडीने अटक केली होती. जवळपास ११ महिने अनिल देशमुख यांनी तुरुंगात काढले असून त्यांच्या जामिनावर बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशमुख यांनी १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला असून ते नोव्हेंबर २०२१ पासून तुरुंगात होते.
दरम्यान, अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अटकेत असलेले माजी पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला होता.
परमबीर सिंह यांनी पत्रातून हे आरोप केले होते. या प्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाई केली. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.