Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ढवाण यांची तडकाफडकी बदली..!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 4 October 2022, 15:31

बारामती : येथील तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांची मुख्यालयात बदली करण्यात आली असून तात्पुरता पदभार पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्याकडे देण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी त्यांच्या बदलीचा आदेश काढला आहे. प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात आल्याचे कारण नमूद करण्यात आले असले तरी या तडकाफडकी बदलीमागे काही वेगळी कारणे असल्याची चर्चा बारामतीत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेची बारामतीत जोरदार चर्चा आहे. या बाबत वरिष्ठ अधिकारीही प्रशासकीय बदली असल्याचे सांगत असले तरी इतकी तडकाफडकी बदली होण्यामागे नक्कीच दुसरे कारण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याची दखल घेत ही बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ढवान यांच्या बदलीने बारामती शहरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

बारामती हे संवेदनशील शहर समजले जाते. स्वताः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीच्या बाबतीत बारकाईने लक्ष असते. बारामतीत चुकीचे कसलेच प्रकार ते खपवून घेत नाहीत. अधिकारी किंवा कार्यकर्ते कोणीही असले तरी चुकल्यावर कारवाई करताना अजित पवार मागेपुढे पाहत नाहीत. गेल्या आठवड्यात घडलेल्या घटनेचीच चर्चा बारामतीत रंगली होती. सुरवातीला दबक्या आवाजात ही चर्चा होती, मात्र नंतर उघडपणे या बाबी बोलल्या गेल्या. वरिष्ठ अधिका-यांपर्यंतही हे प्रकरण पोहोचले होते, प्रारंभी वरिष्ठांनीही या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नाही, असेच चित्र होते, मात्र नंतर या प्रकरणाचे गांभीर्य वाढल्याने वरिष्ठांनी तडकाफडकी बदलीचा निर्णय घेतला.

 

जिल्हा पोलिस अधिक्षकांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, ४ ऑक्टोबरला जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाची बैठक झाली. त्यात ढवाण यांची नियंत्रण कक्षात बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला. ढवाण यांनी बदली झालेल्या ठिकाणी त्वरीत हजर होवून तसा अहवाल सादर करण्याचेही आदेश जिल्हा पोलिस अधिक्षकांनी दिले आहेत.

दरम्यान,  ढवाण हे २४ सप्टेंबरपासून अर्जित रजेवर आहेत. त्यांचा पदभार पुणे ग्रामीणच्या डायल ११२ चे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. पुढील आदेशापर्यंत तो मोरे यांच्याकडेच राहणार असल्याचे पोलिस अधिक्षकांच्या पत्रात म्हटले आहे. बारामतीत अधिका-यांनी काही चुकीच्या बाबी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या चुकीला माफी मिळत नाही हेच या घटनेने अधोरेखीत झाले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Weather Update: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात अतिवृष्टीचा तडाखा; शाळांना सुट्टी, अनेक भागांत पूरस्थिती

Monday, 6 July 2026, 7:53

Daily Horoscope: सोमवार ठरणार ‘या’ राशींसाठी सुवर्णसंधी? वाचा 12 राशींचे संपूर्ण भविष्य

Monday, 6 July 2026, 7:42

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16
Next Post
vacancy in pune air force school pune

MPSC तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा, वनक्षेत्रपाल, उपसंचालक, तालुका कृषी अधिकारी ; 378 रिक्त पदे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.