Pune crime : पुणे: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीबरोबर शारीरीक संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिल्यावर जबरदस्तीने गर्भपात करायला भाग पाडले. (Pune crime) लग्नाचा विषय काढल्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मे २०२१ ते डिसेबर २०२२ दरम्यान घडला. (Forced abortion after intercourse; Caste abuse when the subject of marriage is brought up)
याप्रकरणी मुंढवा येथील एका २७ वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. (Pune crime) त्यानुसार पोलिसांनी सचिन सतीश काकडे (वय २५, रा. मंठा, जि. जालना), सतीश काकडे, लक्ष्मी काकडे यांच्यावर अॅट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
तरुणासह तिघांवर अॅट्रोसिटी
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना सचिन काकडे याने लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याबरोबर वारंवार जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. (Pune crime) फिर्यादी या गर्भवती राहिल्यानंतर त्यांना लासलगाव येथे घेऊन जाऊन त्यांचा जबरदस्तीने गर्भपात केला. त्यानंतर त्यांनी लग्नाविषयी विचारल्यावर त्यांना जातीवाचक बोलून शिवीगाळ करुन धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई तपास करीत आहेत.