पुणे : पुणे सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच व्हाट्सॲप व्हिडीओ कॉलद्वारे साक्ष घेऊन आरोपीची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी (ता. २०) दिले आहेत.
जखमी साक्षिदार हा नेपाळ मध्ये राहायला गेल्यामूळे केसमधील साक्षीदार हजर ठेवण्यास पोलिसांना अडचण येत होती. परंतु त्यावेळी तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. नावंदर यांनी व्हाट्सॲप व्हिडीओ कॉल द्वारे फिर्यादी यांची नेपाळ आणि डॉक्टरांची बेंगळुरूवरून साक्ष घेण्याचा आगळा वेगळा उपक्रम राबवला. अश्या प्रकारे पहिल्यांदाच व्हाट्सॲप व्हिडीओ कॉल द्वारे साक्ष घेतल्या मुळे व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न्यायालयीन कामकाजात केल्यामुळे ही केस खूप आगळीवेगळी ठरली आहे.
संबंधित केसमधील फिर्यादी जगत लालबहादूर विश्वकर्मा यांनी समर्थ पोलीस ठाण्यात २ जून २०१६ रोजी खून, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी समवेत एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. या वेळी विश्वकर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी संजय राजू घाडगे (वय-३४) याने फिर्यादी हा घटनेच्या दिवशी संध्याकाळी मित्राला भेटायला पत्र्याची चाळ, नानापेठ येथे गेला होता.
सदर ठिकाणी असलेल्या वसाहतीत विश्वकर्माचे नातेवाईक राहत असल्याने त्यांचा कडे जेवण करणेसाठी गेला व दरवाजा वाजवत असताना आरोपी संजय घाडगे याने फिर्यादी यास दारू पिऊन शिवीगाळ केली होती. तसेच दोघांमध्ये भांडणे मिटले होते. नंतर फिर्यादी घरी जायला निघाला असता आरोपी संजय याने त्याचा पाठलाग करून विश्वकर्मा यांच्या पाठीत डोक्यावर चाकुने सपासप वार करून आरोपी पळून गेला होता. सदर केस मध्ये सरकार पक्षाने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तथा इतर साक्षीदार तपासले.
दरम्यान, आरोपी संजय यानेच चाकूने मारहान केली आहे हे सिद्ध करणारा पुरावा कोर्टापुढे येऊ शकला नसल्याने आरोपी यास निर्दोष सोडण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री हेडाऊ साहेबांच्या कोर्टाने दिले आहेत. या केस मधील जखमी साक्षिदार हा नेपाळ मध्ये राहायला गेल्या मूळे केस मध्ये साक्षीदार हजर ठेवण्यास पोलिसांना अडचण जात होती. परंतु त्यावेळी तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. नावंदर यांनी व्हाट्सॲप व्हिडीओ कॉल द्वारे फिर्यादी यांची नेपाळ आणि डॉक्टरांची बेंगळुरूवरून साक्ष घेण्याचा आगळा वेगळा उपक्रम राबवला. अश्या प्रकारे पहिल्यांदाच व्हाट्सॲप व्हिडीओ कॉल द्वारे साक्ष घेतल्या मुळे व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न्यायालयीन कामकाजात केल्यामुळे ही केस खूप आगळीवेगळी ठरली असल्याचे आरोपीचे वकील श्री अँड नितीन भालेराव यांनी सांगितले. आरोपी तर्फे अँड विपुल दुशिंग, अँड नितीन भालेराव यांनी कामकाज केले.