शिरूर, (पुणे) : Pune Accident News – शेतातून कांदा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरून घरी घेऊन जात असताना ट्रॅक्टरच्या ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. (Pune Accident News) शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे ही घटना घडली आहे. (Pune Accident News)
भूषण विजय रणदिवे (वय ३१) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत मृत तरुणाचा चुलत भाऊ आशुतोष दत्तात्रय रणदिवे याने न्हावरे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेने रणदिवे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव सांडस येथे रणदिवे यांचे शेत आहे. बाप लेक शेतातील कांद्याचे पीक काढून ट्रॅक्टर ट्रॉलीत भरुन घरी येते होते. घरी जात असताना शेतकरी तानाजी भंडलकर यांच्या शेताजवळ ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाला. त्यात रस्ता उताराचा असल्याने त्यात ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाल्याने ट्रॅक्टर रस्त्यावरून सुसाट झाला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटला.
ट्रॅक्टर उलटल्याने तरुण त्या ट्रॉली खाली अडकला आणि त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपाचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचे वडील देखील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. घरातील तरुण मुलगा गेल्याने रणदिवे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
संपूर्ण गावाच्यासमोर त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी न्हावरे पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील कारवाई, तपास करण्याचे काम सुरू आहे. सर्वांशी मिळून मिसळून राहणे हा त्याचा स्वभाव होता. मात्र आता तोच नसल्याने मित्रांना देखील दुःख झाले आहे. या घटेनेने शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.