पुणे : सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर अमर मूलचंदानी यांच्यासह काही संचालकांचे घर व कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने शुक्रवारी (ता. २७) छापा टाकला आहे.
पिंपरीतील दि सेवा विकास सहकारी बँकेत संगणमताने बेकायदेशीररित्या, आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी आरबीआयने कारवाई केली आहे.
तसेच दोन महिन्यांपूर्वी बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँक गैरव्यवहार प्रकरणी इडीने कारवाई करावी, अशी मागणी ठेवीदारांनी केली होती. शुक्रवारी (ता. २७) सकाळीच इडीचे पथक पिंपरी-चिंचवड शहरात मध्ये दाखल झाले.
पिंपरीतील गणेश हॉटेल, तपोवन मंदिराजवळ मिस्ट्री पॅलेस या इमारतीत अमर मुलचंदानी यांचे निवासस्थान आहे. याच ठिकाणी ईडीचे अधिकारी आज सकाळपासून ठाण मांडून आहेत. कसून तपासणी सुरू आहे.
बँकेच्या तत्कालीन संचालकांनी नियमबाह्य पद्धतीने कर्ज वितरीत केले. यामुळे बँकेचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. या प्रकरणात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मूलचंदानी यांच्यासह काही जणांना अटकही केली होती. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच ते जामिनावर बाहेर आले आहेत. आता ईडीने पुन्हा त्यांच्यावर कारवाई केली